दारू पिण्याचा परवाना घेतला का? उत्पादन शुल्क विभागाने नऊ महिन्यांत दिले इतके परवाने

दारू पिण्याचा परवाना घेतला का?
उत्पादन शुल्क विभागाने नऊ महिन्यांत दिले सहा लाख परवाने
परवाना घेतलेल्या मद्यपींची संख्या
देशी दारु : 2 लाख 31 हजार 800
विदेशी दारू : 3 लाख 8 हजार 400नाशिक  ः देवयानी सोनार
गटार अमावस्या असो वा थर्टी फर्स्ट.. मद्यपींसाठी ही एक पर्वणीच असते. मद्यपान करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना देण्यात येतो. हे परवाने दारु दुकानातही उपलब्ध असतात. गेल्या वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने सहा लाख 200 परवाने दिले. त्यात डिसेंबरमध्ये थर्टी फर्स्ट असल्याने सर्वाधिक मद्यपींनी परवाने घेतले आहेत.
सण समारंभ,लग्नसराई, नाताळ,नववर्षाच्या निमित्ताने दारू पिण्यासाठी तळीरांमांना कारण पुरेसे असते. त्यामुळे नववर्षाच्या पूर्वसंध्येला अनेकजण मद्यपानाला प्राधान्य देतात. मद्य खरेदी करायचे असल्यास परवाना लागतो. गेल्या नऊ महिन्यात देशी विदेशी मद्य खरेदी करण्यासाठी राज्य उत्पादन विभागाकडून एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यात 6 लाख 200 परवाने देण्यात आले असून यामध्ये देशी विदेशी मद्याचे परवाने देण्यात आले आहे.
एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत देशी दारूचे 2 लाख 22 हजार 600 परवाने देण्यात आले. विदेशी दारूचे 2 लाख 29 हजार 700 परवाने देण्यात आले.
वर्ष अखेरीस नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने तळीरांमाना दारू पिऊनच आनंद साजरा करण्याचे नियोजन असल्याने डिसेंबर मध्ये देशी 9 हजार 200 परवाने तर विदेशी दारूचे 1 लाख 38 हजार 700 परवाने वितरित करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काचे पोलिस अधिक्षक शशिकांत गर्जे यांनी दिली.
एप्रिल ते डिसेंबर  या कालावधीत देशी 2 लाख 31 हजार 800 परवाने देण्यात आले तर विदेशी 3 लाख 8 हजार 400 परवाने वितरित करण्यात आले.दारूसाठी तीन ते चार प्रकारचे परवाने असतात. एका दिवसासाठीचा, आठवडाभरासाठीचा, वर्षभरासाठीचा आणि कायमचा परवाना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *