हद्दपार सराईत गुन्हेगार पिस्तुलासह जेरबंद

व्यापार्‍यांकडून पैशांची मागणी; खंडणीविरोधी पथकाची कामगिरी

पंचवटी : प्रतिनिधी
खून व दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला सराईत गुन्हेगार किरण सुखलाल केवर (वय 25, रा. फ्लॅट नंबर 101, चामुंडा ग्रीन अपार्टमेंट, शांतीनगर, गॅस गोडावूनसमोर, मखमलाबाद) यास खंडणीविरोधी पथकाने पिस्तूल व जिवंत काडतुसासह जेरबंद केले आहे. शस्त्राचा धाक दाखवून दुकानदारांकडे पैशाची मागणी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी पथकातील हवालदार दत्तात्रय चकोर व मंगेश जगझाप यांना, किरण केवर हा हद्दपार असूनही पिस्तूल हातात उघडपणे घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवून बाजारातील दुकानदारांकडे पैशाची मागणी करत असल्याची माहीती मिळालेली होती. त्यांनी याबाबतची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर पथकाने मखमलाबाद येथील श्री तिरुमाला गुलमोहर बिल्डिंगजवळील आवजीनाथ टी-स्टॉल येथे सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, श्रेणी उपनिरीक्षक दिलीप सगळे, दिलीप भोई, हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, भूषण सोनवणे, मंगेश जगझाप, चारुदत्त निकम, भगवान जाधव व भरत राऊत यांनी ही कामगिरी बजावली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *