आयटी क्षेत्रात नाशिकमध्ये विस्तार ः खा.गोडसे

डेसिमल पॉईंट ऍनालिटिक्समध्ये नोकरीच्या संधी
स्थानिक चार हजार युवांना मिळणार रोजगार
नाशिक ःप्रतिनिधी
नाशिक शहर आणि जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी नाशिक आडगाव परिसरात शंभर एकर जागेवर आयटी क्षेत्राचा विस्तार करण्यात येणार असून आय टी क्षेत्राचा नाशिकमध्ये विस्तार करणार असल्याचे खा.हेमंत गोडसे यांनी डेसिमल पॉईंट ऍनालिटिक्स आयटी कंपनीच्या उद्धघाटनप्रसंगी माहिती दिली.
नाशिकमध्ये डेसिमल पॉईंट ऍनालिटिक्स कंपनी सुरू झाली असून सध्या येथे 400हून अधिक कर्मचारी काम करीत आहे.भाविष्यात चार हजार तरूणांना रोजगाराच्या संधी देण्यात येणार आहे.तसेच डेसिमल पॉईंट ऍनालिटिक्समध्ये मध्यमवर्गीय तरूणांना सक्षम करण्यासाठी डाटा विश्लेषक म्हणून नाशिकच्या युवकांना संधी देणार आहे.
नाशिक आमच्या भविष्यातील व्यवसाय वाढीस चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास धुरी यांनी व्यक्त केला.डेटा ऍनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स,आधुनिक तंत्रज्ञान लर्निगसह डिजिटायझेशन या सध्याच्या करइरच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. असल्याचे शैलेश धुरी (सीईओ)डेसिमल पॉइर्ंट ऍनालिटिक्स यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते काल (दि.13) डेसिमल पॉईंट 7वा मजला रुगंटा सुप्रीमसी चंाडक सर्कल येथे उद्घघाटन करण्यात आले.
आडगाव परिसरात शंभर एकर जागेवर आयटी सेंटर सुरू करण्यात येणार आहे.बाहेरील जिल्ह्यात किंवा राज्याच्या तुलनेत नाशिकचे वातावरण,पायाभूत सुविधा,कुशल तंत्रज्ञ,कनेक्टिव्हिटी चांगली आहे.त्यामुळे नाशिकला आयटी हब तयार करण्याचा मानस डेसीमल पॅाइन्टचे गौरव गुप्ता यंानी सांगितले.सेवा क्षेत्रत्तत मिळणार्‍या कामतून येणारा पैसा हा भारतातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केला जाणार आहे.
यावेळी डेसिमल पॉईंट ऍनालिटिक्सचे सीपीओ अरूण सिंग यांनी
डेसिमल पॉईंट ऍनालिटिक्समध्ये 100 टक्के ग्रीन झोन कार्यालय असून ज्यामध्ये वापरासाठी वापरण्यात येणारी वीज शून्य कार्बन अक्षय उर्जेपासून मिळविण्या येणार आहे.शहरात उत्तम पायाभूत सुविधा असल्याने चांगल्या संधी भविष्यात उपलब्ध होवू शकती असा विश्वास व्यक्त केला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *