नूतन अतिरिक्त आयुक्तांच्या दालनावर उधळपट्टी

 

 

आवश्यक नसताना काम करण्याची गरज काय

 

 

नाशिक : प्रतिनिधी

 

 

मागील आठवड्यातअतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम यांची बदली झाली असून. त्यांच्या जागी शिर्डी येथील मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांची नियुक्ती झाली. बानाईत त्यांनी पदभार स्विकारला असला तरी त्यांनी कामकाजाला सुरुवात केली नाही.दरम्यान पालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असताना अतिरिक्त आयुक्तांच्या दालनाच्या कामासाठी विनाकारण पैशाची उधळपट्टी केली जात असल्याची कुजबुज सुरु आहे.

 

 

आर्थिक चणचन असल्याने अनेक कामाना कात्री लावण्यात आली आहे. दुसरीकडे मात्र पालिकेतच अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनात एकप्रकारे उधळपट्टी सुरु आहे.सध्या युध्दपातळीवर बानाईत यांच्या दालनाचे काम सुरु असून, चेहरा मोहरा बदलण्याचे काम सुरु आहे. विशेष म्हणजे आवश्यकता नसताना देखील रंगरंगोटी व इतर कामे केली जात आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. अगोदरचे दालन सुस्थितीत असतानाही पैशांची अनावश्यक उधळपट्टी सुरु असल्याची चर्चा आहे. महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरु असून कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी अनेक महत्वाच्या विकासकामांना कात्री लावण्यात आली आहे. असे असताना दालन नुतनीकरणावर अनाठायी खर्च महापालिका प्रशासनाला परवडतो कसा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असताना नुतन अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानाईत य‍ांच्या दालन चकाचक करण्यासाठी हजारो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. दालनाचे नुतनीकरण झाल्यानंतरच त्या दैनंदीन कामकाज सुरु करतील, असे बोलले जात आहे. यापूर्वी आत्राम यांनी याच कार्यालयातून बसून काम केले. त्यांची बदली होताच दालनाची रंगरागोटी करण्याची गरज काय असा सवाल केला जातो आहे

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *