फडणवीस- मुंडेंचा एकाच कारमधून प्रवास

वादावर पडदा पडल्याची राजकीय गोटात चर्चा
नाशिक : प्रतिनिधीभाजपमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडेे यांना डावलले जात असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु आहे. यावरूनच की काय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि मुंडे यांच्यात अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा वारंवार ऐकायला मिळतात. मात्र, नाशिकमध्ये  शनिवारी (दि.11)  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री पंकजा मुंडेे एकाच वाहनातून भाजपच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणी अधिवेशनासाठी  पोहोचले. यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये असलेल्या छुपा संघर्षावर  पडदा पडला का? अशी चर्चा नाशिकसह राज्याच्या राजकारणात यनिमित्ताने सुरु झाली आहे.
नाशिकमध्ये शुक्रवारपासून दोन दिवसीय भाजप कार्यकारिणीची बैठक होती. यासाठी राज्यभरातून भाजपचे दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित होते. यात देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांच्यासह पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या. दुपारी कार्यक्रमस्थळी येत असताना देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे हे दोघेही एकाच गाडीतून बैठकस्थळी पोहोचले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावलेल्या कार्यक्रमांपासून पंकजा मुंडे जाणीवपूर्वक पाठ फिरवत असल्याचे  बोलले जात होते. तर देवेंद्र फडणवीस आगामी काळात बीडमध्ये पंकजा मुंडे यांना शह देण्यासाठी जिल्ह्यात नवे नेतृत्व उभे करण्याची तयारी करीत असल्याची कुजबूज सुरू होती. या सर्व घडामोडीमुळे या चर्चांना उधाण आले होते. नाशिकमध्ये सुरू असलेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीला दोघेही एकच गाडीतून आल्याने आता आश्चर्य व्यक्त व्यक्त होत आहे. यापूर्वी भाजपचा संभाजीनगर येथे कार्यक्रम झाला असता तेथेही त्यांना डावल्याची चर्चा होती. त्यामुळे राज्यातील भाजपमध्ये बेबनाव असल्याचे दिसून आले  होतं. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. असे असताना शनिवारी मात्र देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच गाडीतून भाजप कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित झाल्या…

मिळणार मोठी जबाबदारी ?काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे या भाजपच्या अनेक कार्यक्रमांपासून अलिप्त राहत असल्याचे चर्चा होत्या तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती पक्षातीलच काही लोक पंकजा मुंडेंना आणि पक्षाला बदनाम करत असल्याचा आरोपच बावनकुळे यांनी केला होता. मात्र शनिवारच्या प्रसंगानंतर पंकजा मुंडे पुन्हा एकदा भाजपमध्ये सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळात पंकजा मुंडे यांना भाजप पक्ष मोठी जबाबदारी देणार असेही बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *