बनावट नोटा चलनात आणणारी टोळी गजाआड

सिडको: विशेष प्रतिनिधी

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला हादरुन सोडणारा तेलगी घोटाळ्याचे पाळेमुळे देखील सिडकोच मिळुन आले होते त्यानंतर भुजबळ फार्म नजीक असलेल्या पद्मा बंगल्यात विदेशी करन्सी मिळुन आल्याने सर्व खळबळ उडाली होती त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याला बनावट नोटा प्रकरणी अटक करण्यात आली होती या सर्व घटना ताजा असतांना आता पुन्हा एकदा प्रिंटरद्वारे पाचशेच्या नोटांची नक्कल काढून बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रकरण अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली घडली.

याप्रकरणी तिघांना अंबड पोलिसांनी तीन संशयिताना अटक केली असुन तर एक जण फरार झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलीस अंमलदार संदीप भुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अशोक अण्णा पगार (४५, मु. पो. मेंढी ता. सिन्नर जि. नाशिक) हा नकली नोटा चलनात आणणार असून त्या कामी तो येणार आहे. ही माहिती भुरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील पवार यांना दिली यावरून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक के.टी. रौंदळे, अंमलदार किरण गायकवाड, संदीप भुरे, सागर जाधव, राहुल जगझाप, घनश्याम भोये ,सुचितसिंग सोळुंके, राकेश पाटील,पवन परदेशी, मते, राठोड, सचिन करंजे यांचे पथक तयार करून माऊली लॉन्स येथे सापळा रचला. यावेळी रात्री अडीच वाजेच्या सुमारास पगारे हा माऊली लॉन्स येथे आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पाचशे रुपये किमतीच्या बनावट तीस नोटा मिळून आल्या यावरून पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता सदर गुन्ह्यात हेमंत कोल्हे, नंदकुमार मुरकुटे व भानुदास वाघ यांनी सिन्नर येथील एका हॉटेलमध्ये सदर बनावट नोटा बनवल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी व अंमलदारांचे दोन तपास पथके तयार करून संशयित हेमंत लक्ष्मण कोल्हे (मुळ रहाणार सिडको सध्या रहा ३२,रा.सेक्टर नंबर १०, आनंद निवास, प्लॉट नंबर १०१, पहिला मजला, वाशी, नवी मुंबई) यास नाशिक मधून अटक केली तर नंदकुमार तुकाराम मुरकुटे (५२, रा. संजीवनी हॉस्पिटल मागे, सोनार गल्ली,ता. सिन्नर ,जि. नाशिक ) यास सिन्नर येथून सापळा रचून अटक केली. तर चौथा संशयित भानुदास वाघ ( रा. नांदूर शिंगोटे ) हा फरार झाला. संशयकांनी आतापर्यंत किती नोटांची छपाई केली व कोठे वितरित केल्या आहेत व यापूर्वी नुकत्याच झालेल्या निवडणुकात या नोटांचा वापर झाला का आधी विविध बाबींचा पोलीस आता शोध घेत आहेत.

Bhagwat Udavant

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

2 days ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

2 days ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

2 days ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

2 days ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

2 days ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

2 days ago