नाशिक: प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यात पावसामुळे एका शेतकऱ्याचा बळी गेल्याची घटना आज घडली.
मौजे नळवाडी, ता. सिन्नर येथील शेतकरी खातेदार रामदास दगडु सहाणे वय अंदाजे 35 वर्ष हे आज दिनांक 16/5/2025 रोजी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस मध्ये विजेच्या तारेला शॉक बसून विहिरीत पडून मयत झाले आहे. आज सिन्नर तालुक्यातील भास,नलवाडी या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.