खेडल्यात शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

खेडल्यात शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

लासलगाव : प्रतिनिधी

निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील राजेंद्र शिवाजी शिंदे (वय ४८) यांचा शेतात काम करत असताना रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी आणि दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.राजेंद्र शिंदे रविवारी सकाळी साडेनऊला शेती कामासाठी शेतात असताना तिथे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.ही बाब त्यांचे चुलत भाऊ नामदेव शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता,वैद्यकीय
अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

दरम्यान,राजेंद्र शिंदे यांच्या मृतदेहाजवळ शेतामध्ये कीटकनाशकांच्या बाटल्या आढळून आल्या होत्या. त्यामुळे राजेंद्र शिंदे याचा मृत्यू नेमका कशाने झाला,हे स्पष्ट झाले नव्हते.घटनेची माहिती लासलगाव पोलीस ठाण्याला देण्यात आली.मृत्युचे कारण कळण्यासाठी राजेंद्र शिंदे यांचा मृतदेह निफाड येथील रुग्णालयात दाखल करून शवविच्छेदन करण्यात आले.शवविच्छेदन अहवालातून त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानेच झाल्याचा खुलासा झाला.त्यानंतर लासलगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार औदुंबर मुरडनर तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *