कर्जाला कंटाळून शेतक-याची शेततळ्यात आत्महत्या
येवला तालुक्यातील घटना,
येवला प्रतिनिधी तालुक्यातील वडगांव बल्हे येथिल एका शेतक-यांने बँकेच्या कर्जाला कंटाळून शेततळ्यात आत्महत्या केली आहे भाऊसाहेब दामु वाल्हेकर वय ५५ असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नांव आहे कांद्याला भाव नाही, बँकेचे कर्ज फेडता येत नाही म्हणून शेतकरी वाल्हेकर यांनी काल मध्यरात्री च्या सुमारास आपल्या शेततळ्यात आत्महत्या केली आहे दरम्यान या आत्महत्ये प्रकरणी तहसीलदार आबा महाजन यांनी घटनास्थळी भेट देवुन वाल्हेकर परीवाराचे सात्वंन केले असुन शासन स्तरावर मदत मिळवुन देण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी बाळासाहेब वाल्हेकर तसेच गांवातील ग्रामस्थ उपस्थित होते.