नाशिक

लासलगावला बियाणे खरेदीसाठी शेतकर्‍यांची झुंबड

खरीप हंगामाची तयारी; कृषी विभागाची सतर्कता आवश्यक

लासलगाव : वार्ताहर
लासलगावसह परिसरात अलीकडील दोन दिवसांत झालेल्या एक इंच पावसामुळे आणि मागील दीड महिन्यात पडलेल्या तब्बल साडेबारा इंच पावसामुळे शेतकर्‍यांमध्ये खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. यामुळे लासलगावसह परिसरातील कृषी सेवा केंद्रांवर बियाणे खरेदीसाठी शेतकर्‍यांची गर्दी पाहायला मिळत आहे.
सध्या शेतकरी सोयाबीन, मका, बाजरी, मूग यांसारख्या पिकांच्या बियाण्यांना प्राधान्य देत आहेत. काही शेतकरी नामांकित कंपन्यांचे बियाणे मागत असले तरी कमी दरात मिळणार्‍या अनोळखी ब्रॅण्ड्सचीही खरेदी होत असल्याचे चित्र आहे. यामुळे बोगस व निकृष्ट बियाण्यांच्या फसवणुकीची शक्यता नाकारता
येत नाही.

कृषी सेवा केंद्रांना सूचना

परवाना नसलेल्या विक्रेत्यांना बियाणे विक्री न करण्याचे आदेश बियाण्याची गुणवत्ता तपासूनच साठवणूक व विक्री करावी. विनाबिलिंग कोणताही माल विकू नये व छापलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमत आकारू नये. बियाण्यांची विक्री दरपत्रक व कंपनी माहिती खुलेपणाने प्रदर्शित करावी. प्रत्येक विक्रीची योग्य नोंदवही ठेवावी.

बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी

अधिकृत बियाणे विक्री केंद्रातूनच खरेदी करावी.
खरेदीचे बिल आवर्जून घ्यावे. बियाण्याचे पॅकिंग, उत्पादन तारीख, कालबाह्यता व बॅच नंबर तपासावा. कोणतेही बियाणे शंका असल्यास कृषी सहाय्यक किंवा विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधावा.

सध्या शेतकर्‍यांमध्ये खरीप हंगामाच्या तयारीसाठी मोठी उत्सुकता आहे. बियाणे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी येत आहेत. आम्ही केवळ प्रमाणित व परवानाधारक कंपन्यांचीच बियाणे विकतो. प्रत्येक खरेदीचे बिल देणे आणि बियाण्याबाबत माहिती देणे ही आमची जबाबदारी आहे. सध्या मक्यासाठी 751, 741 बियाण्यांची मागणी जास्त आहे. शेतकर्‍यांनीदेखील खरेदीच्या वेळी सगळी माहिती घेऊनच निर्णय घ्यावा, जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही.
-बालेश जाधव, बियाणे विक्रेते, लासलगाव

गेल्या वर्षी बोगस बियाण्यामुळे मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे यंदा मी फक्त शासकीय परवानाधारक दुकानातूनच बियाणे घेत आहे. दुकानदाराने बियाण्याबाबत सविस्तर माहिती दिली आणि बिलही दिलं. कृषी विभागाने वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करावे, अशी आमची अपेक्षा आहे.
-राहुल गवळी, शेतकरी, ब्राह्मणगाव

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago