कांदा प्रश्नासाठी शेतकऱ्यांचे दिल्लीत कांद्याच्या माळा घालून
अर्ध नग्न आंदोलन
स्वतंत्र भारत पक्षाचा आंदोलकांना पाठिंबा
लासलगाव :- समीर पठाण
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोसळलेल्या कांद्याच्या दरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने निश्चित धोरण ठरवावे यासाठी चार कांदा उत्पादक शेतकरी दिल्लीत कांद्याच्या माळा घालून अर्ध नग्न आंदोलन करत आहेत.संबंधित मंत्र्यांना भेटून उपाय योजना करण्याचे निवेदन देत आहेत.या आंदोलक शेतकऱ्यांना स्वतंत्र भारत पक्षाचा पाठिंबा असल्याचे,पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
कांद्याचे दर फारच घसरले असून उत्पादन खर्च ही भरून निघत नाही. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने काही उपाय योजना करावी या मागणीचे निवेदन घेऊन पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील चार शेतकरी, सागर फराटे, विजय साळुंके, परशुराम मचाले, नवनाथ फराटे थेट दिल्लीत जाऊन धडकले आहेत. अर्ध नग्न अवस्थेत, गळ्यात कांद्याची माळ व खांद्यावर कांद्याची गोणी घेऊन ते संबंधित मंत्र्यांना भेटून निवेदन देण्याचा प्रयत्न करत आहेत.
कांदा निर्यात धोरणा संदर्भात व कांद्याच्या कमी दरामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाई बाबत, जॉईंट सेक्रेटरी, कृषी मंत्रालय भारत सरकार,पी. अन्बलगन यांना निवेदन दिले.तसेच अर्ध नग्न अवस्थेत कृषी मंत्रालयासमोर या शेतकऱ्यांनी गेटवर सरकारने शेतकऱ्यांच्या केलेल्या अर्ध नग्न अवस्थेचे प्रतीकात्मक स्वरूप म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून त्याचबरोबर कांद्याची एक पिशवी खांद्यावर कांद्याची पिशवी घेऊन पोहोचले.
कृषिमंत्री उपस्थित नसल्याने जॉईंट सेक्रेटरी कृषी मंत्रालय – भारत सरकार अन्बलगन पी. यांची भेट घेतली. या प्रसंगी, चाळीत साठवलेला व शिल्लक असलेल्या कांद्यासाठी केंद्र सरकार काही करण्याच्या विचारात आहे मात्र महाराष्ट्र शासनाने अद्याप प्रस्ताव पाठवला नाही असे जॉइंट सेक्रेटरी यांचे म्हणणे होते. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या अमलात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयात निवेदन देण्यासाठी शेतकरी अर्धनग्न अवस्थेत जात असताना दिल्ली पोलिसांनी अटक करून संसद भवन – कर्तव्य पथ, पोलीस स्टेशन येथे स्थानबद्ध केले. नंतर पोलिसांनी शेतकरी सागर फराटे यांना सोबत घेऊन प्रधानमंत्री कार्यालय येथे निवेदन दिले. व नंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना मुक्त केले.कांदा व्यापाराशी संबंधित असलेल्या कृषी, पणन, ग्राहक व्यवहार, परराष्ट्र व्यापार मंत्री सर्व मंत्र्यांच्या भेटी घेऊन कांदा समस्येवर चर्चा करणार आहेत.
स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी शेतकऱ्यांच्या या प्रयत्नाचे व धाडसाचे कौतुक केले असून आंदोलनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. केंद्र शासनाला आवश्यक असलेला प्रस्ताव तातडीने राज्य सरकारने पाठवावा यासाठी राज्याचे कृषिमंत्री दत्ताजी भरणे यांच्याशी संपर्क करणार असल्याचे घनवट यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी काही जांबाज शेतकऱ्यांनी गणिमी काव्याने दिल्ली गाठली व संबंधित वाणिज्य मंत्री, क्रुषी मंत्री यांच्या कार्यालयावर अर्धनग्न अवस्थेत असताना त्यांच्या गळ्यातील कांद्याच्या माळा बघुन त्यांना अटक केली, गेल्या दोन महिन्यांपासून आपण कांद्याची जी दुरावस्था झाली ती महाराष्ट्र शासन, संबंधित क्रुषी मंत्री, यांच्या निदर्शनास आणून दिली आहे, परंतु राज्य सरकारने कांद्याच्या भावाचा व आयात निर्यात धोरण निश्चित करण्यासाठी केंद्र सरकार कडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले जात आहे परंतु अद्यापही या प्रश्नाविषयी केंद्रीय कृषिमंत्री वा, वाणिज्यमंत्रालयांकडून काहीही सकारात्मक प्रतिसाद दिला जात नाही ही दुर्दैवाची बाब आहे
अनिल घनवट
राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष.
कुबेर जाधव
समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना
शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू सिडको : दिलीपराज सोनार जुने सिडको परिसरातील शॉपिंग…
लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मुंबई: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा…
राधाकृष्णनगरमध्ये परप्रातीय स्वयंघोषित भाईचा राडा गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत सातपूर : सातपूर…
जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दाखल करण्यास नकार — छावा क्रांतीवीर सेनेकडून रुग्णालय प्रशासनाचा तीव्र निषेध!…
सिडको : विशेष प्रतिनिधी वृद्धेच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून…
जमीन खंडणी प्रकरणी सातपुर पोलिसात गुन्हा सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर परिसरात खंडणी व…