ढगाळ वातावरण,दाट धुके व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान…!
मनमाड: आमिन शेख
गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण दाट धुके व दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असुन कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आधीच शेतीमालाला भाव नाही यामुळे संकटात असलेला बळीराजा आणखी संकटात सापडला आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांची दखल घेऊन नुकसान झालेल्या भागाचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी किसान सभेचे जिल्हा संघटक विजय दराडे यांनी केली आहे.
कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेल्या बळीराजाला आता पुनः एकदा अतिवृष्टीचा फटका बसला असुन गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण दाट धुके व दोन दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात होत असलेली अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली असुन आधीच भाव नसलेला शेतीमाल व आता कांदा व द्राक्ष पिकांचे होत झालेले नुकसान यामुळे शेतकरी मोठया अडचणींत सापडला असुन ज्या भागात अतिवृष्टी झाली व शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या भागातील तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी जेणेकरून बळीराजा पुन्हा उभा राहील अशी मागणी किसान सभेचे जिल्हा संघटक कॉ विजय दराडे यांनी केली आहे भविष्यात शेतीमालाला हमीभाव मिळावा याशिवाय शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासुन परावृत्त करण्यासाठी धोरण आखणे गरजेचे असल्याचे मत देखील दराडे यांनी व्यक्त केले असुन जर बळीराजाला आर्थिक मदत केली नाही तर राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा दराडे यांनी दिला आहे.