नागरिकांमध्ये दहशत
सातपूर :
शहरातील सातपूर येथील कार्बन नाका परिसरात असलेल्या म्हसोबा मंदिराजवळ तरुणावर जिवघेणा हल्ला झाला आहे. आपसातील जुन्या वादातून तिघांनी तरुणावर गोळीबार तसेच कोयत्याने वार केले. यानंतर मारेकऱ्यांनी आपले वाहन घटनास्थळी सोडून कामगाराला धाक दाखवत त्याच्या दुचाकीने पळ काढला. ही सिनेस्टाईल घटना रविवारी (ता. १९) दुपारी घडली.
रविवारी दुपारी तपन जाधव आपल्या चारचाकीमधून (MH 04 EX 5678) प्रवास करत असताना कार्बन नाका परिसरात आरोपी आशिष जाधव आपल्या २ साथीदारांसह (MH 15 DM 7639) या वाहनातून येत तपनच्या गाडीला धडक दिली. यानंतर गाडीखाली उतरत त्याच्यावर कोयत्याने वार केले यासह गोळीबार केलाय. तिघांनी मिळून केलेल्या या हल्ल्यात तपन जाधव गंभीररित्या जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेनंतर धडक बसल्याने आरोपींची गाडी बंद पडली होती. यामुळे त्या मार्गावरुन जाण्याऱ्य़ा एका कामगाराला आरोपींनी थांबवले. बंदूक अन् कोयत्याचा धाक दाखवत त्या कामगाराची दुचाकी (MH 15 FU 7656) घेऊन आरोपींनी घटनस्थळावरुन पळ काढला. संशितांच्या गाडीमध्येकोयते आणि मिरची पावडर मिळून आले आहेत. सातपूर पोलिस घटना स्थळी दाखल झाले असून संशयित आरोपी फरार झाले असून पोलिस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.
हे पाहा सीसीटीव्ही फुटेज:
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…
ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर: साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…