सातपूरला दोन मुलांसह पित्याची आत्महत्या

 

 

 

आर्थिक विवंचनेतून उचलले टोकाचे पाऊल

नाशिक / सातपूर : प्रतिनिधी

सातपूरच्या अशोकनगर येथे फळविक्री करणार्‍या विक्रेत्याने त्याच्या दोन तरुण मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी घडली. आर्थिक विवंचनेतून हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात आहे.

याबाबतचे वृत्त असे की, सातपूरच्या अशोकनगर भागातील बोलकर व्हॅलीजवळील आशापुरी निवास या घरात दीपक शिरोडे (55), मोठा मुलगा प्रसाद (25) राकेश (23) हे राहतात. काल दुपारी दीपक शिरोडे यांची पत्नी बाहेर गेली होती. त्यामुळे तिघांनीही वेगवेगळ्या खोलींत फॅनच्या हुकला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. दुपारी साडेतीनच्या दरम्यान दीपक शिरोडे यांची पत्नी बाहेरुन आल्या असता हा प्रकार उघडकीस आला. दीपक शिरोडे हे दोन मुले पत्नी आणि सुन यांच्यासह राहतात. त्यांचा अशोकनगर बसस्टॉपजवळ फळांचा व्यवसाय आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत होते. अशी चर्चा आहे. त्यातूनच त्यांनी दोन्ही मुलांसह आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. शिरोडे यांची पत्नी दुपारी घरी येताच शेजारच्या मंडळींच्या मदतीने घराची कडी उघडण्यात आल्यावर आतील दृश्य पाहून त्यांनी हंबरडाच फोडला. याबाबत घटनेची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर यांनी तातडीने धाव घेतली. अधिक माहिती मिळविण्याचे काम सुरू होते.

शिरोडे कुटुंब हे मुळचे उमराणे येथील रहिवासी आहेत. गेल्या दहा वर्षांपूर्वी ते नाशिकमध्ये आले. राधाकृष्णनगरमध्ये त्यांचे घर असून, दीपक शिरोडे आणि त्यांचे दोन्ही मुले या भागात हातगाड्यावर फळांची विक्री करीत असत.तथापि,ग़ेल्या़ काही दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत होते.

 

सकाळी नात झाल्याचा आनंद अन्

शिरोडे यांचा मोठा मुलगा प्रसाद याचे लग्न झालेले आहे. त्यांची पत्नी प्रसूतीसाठी मुंबईला गेलेली होती. काल सकाळीच त्यांना मुलगी झाली. घरात लक्ष्मी आल्याच्या आनंदात सगळे कुटुंब होते. मात्र, दुपारीच अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *