नाशिक :प्रतिनिधीसध्याच्या दिवसात उन्हाचा पारा हा चढत असून जवळपास ते 40 डिग्रीच्या वर असल्याने शीतपेय, फळे, आइस्क्रीम, फ्रोझन डेझर्ट तसेच एनर्जी ड्रिंक्सची मोठयाप्रमाणात बाजारात विक्री होत असून, गुणवत्तेच्या बाबत अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे.
शरदचंद्र पवार मार्केट या ठिकाणी श्री शारदा फ्रुटस कंपनी, एपीएमसी मार्केट, पेठरोड, पंचवटी, नाशिक या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी. रासकर यांनी तपासणी करून विक्रीसाठी साठविलेल्या आंबा व आंबा पिकविण्यासाठी वापरण्यात येणारे इथेलीन रायपनर सॅचेटस चे नमुने घेण्यात आले. त्यानंतर ओझर येथे व्ही.ए.एन.सी. एजन्सी, ओझर या ठिकाणी प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी देवरे यांनी धाड टाकून त्या ठिकाणी विक्रीसाठी साठविलेले शितपेय 1 थम्सअप, मँगो ड्रिंक्स माझा व स्टिंग एनर्जी ड्रिंकचे नमुने घेऊन स्टिंग एनर्जी ड्रिंक्सच्या 19, 200 रुपयांच्या 960 बाटल्या जप्त केल्या.
त्यानंतर व्यंकटेश डिस्ट्रीब्युटर्स, मालेगाव या ठिकाणी भेट देऊन फ्रोझन डेझटचा नमुना घेऊन विश्लेषणासाठी पाठविण्यात आलेला आहे. दि.20 एप्रिल रोजी आकाश एजन्सी, गणेश कंपाऊंड, जऊळके या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख, सहायक आयुक्त विवेक पाटील यांनी धाड टाकली असता त्या ठिकाणाहून स्टिंग कॅफिनेटड विव्हरेज, थम्सअप चार्ज कॅफिनेटड विव्हरेज व मॉनस्टर कॅफिनेटेड विव्हरेज चे नमुने घेऊन एकूण 13,200 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले असून, अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही धडक मोहीम संपूर्ण उन्हाळाभर सुरु राहणार आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी, योगेश देशमुख,अमित रासकर, संदीप देवरे, वाहनचालक निवृत्ती साबळे व नमुना सहाय्यक विजय पगारे यांनी सहाय्यक आयुक्त (अन्न), . विवेक पाटील, मनिष सानप, उदय लोहकरे व सहआयुक्त संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.