नाशिक

निफाडच्या 146 गावांचे रेकॉर्ड नष्ट होण्याची भीती

जीर्ण इमारतीत अभिलेखागार कक्ष; शंभर वर्षांपूर्वीची कागदपत्रे ओली

निफाड : तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील 146 गावांचे महसुली दस्तऐवज, अभिलेख असलेले 115 वर्षांपासूनचे रेकॉर्ड प्रशासनाच्या अनास्थेमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
निफाड गावात असणार्‍या येथील तहसील कार्यालयाच्या ब्रिटिशकालीन इमारतीत तालुक्याचे अभिलेखागार कक्ष आहे. येथील कक्षात 1911 पासूनचे रेकॉर्ड आहे. ब्रिटिशकालीन असलेली ही इमारत जीर्ण झाली आहे. कौलारू इमारत गेल्या अनेक वर्षांपासून गळत असल्याने 100 वर्षांपूर्वीचे कागदपत्रे ओले होतात, फाटतात, त्याला वाळवी लागते. त्यामुळे महसुली दप्तरासाठी असणार्‍या महत्त्वाच्या नोंदी या गडप होण्याची भीती आहे.
2022 मध्ये या ठिकाणाहून निफाड तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालय 3 किमी अंतरावर रसलपूर शिवारात स्थलांतर झाले आहे. वास्तविक, या कार्यालयाचा कारभार ज्या महत्त्वाच्या नोंदीवर चालतो, तो अभिलेख कक्षही स्थलांतर व्हायला पाहिजे होता. परंतु, या कार्यालयाचे स्थलांतर होऊन 3 वर्षे उलटूनही अभिलेख कक्ष मात्र स्थलांतर न झाल्याने तालुक्यातून दप्तरी नोंदी घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना ऑफिसच्या कामाला मुख्य इमारत व नोंदी घेण्यास जुनी इमारत अशी सहा किमीचा वेळखाऊ प्रवास करावा लागतो. मूळ कागदाची नक्कल घेतल्यावर अधिकार्‍यांच्या सहीसाठी पुन्हा मुख्य कार्यालयात जावे लागते.
सध्या अभिलेख कक्ष आहे, शेजारी पोलीस ठाणे असल्याने अभिलेख कक्ष सुरक्षित होते. आता पोलीस ठाणेही स्थलांतर झाल्याने सायंकाळी सहानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत हा कक्ष रामभरोसे असतो. या कक्षामागील बाजूस व्यसनींचा रात्री राबता असतो. या कक्षाच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा दिसत
आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामुळे रखडले स्थलांतर

नवीन तहसील कार्यालयात अभिलेख कक्षासाठी स्वतंत्र इमारतीची उपलब्धता आहे. मात्र, हे सर्व अभिलेख रचून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या रॅक उपलब्ध करून न दिल्यामुळे हे स्थलांतर थांबले आहे. या कक्षासाठी 36 रॅकची गरज असताना बांधकाम विभागाने आतापर्यंत केवळ 10 ते 12 रॅक दिल्याने सर्व अभिलेख बसू शकत नसल्याने स्थलांतर होऊ शकले नाही. तहसील कार्यालयाने यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला आतापर्यंत अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे 100 वर्षांपूर्वीच्या मूळ दस्तऐवज नष्ट होण्याची भीती आहे.

अभिलेख ठेवायला पुरेशा रॅक उपलब्ध न झाल्याने रेकॉर्ड रूम स्थलांतर होऊ शकला नाही. आम्ही बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला असून, लवकर स्थलांतर करण्याच्या तयारीत आहोत. सर्व अभिलेखांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहेत. – विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago