फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकणे पडले महागात
घोटी पोलीस ठाण्यात युवकावर गुन्हा दाखल
इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या घोटी येथील एका तरुणाला फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकणं महागात पडलं आहे.दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकल्याबद्दल एका तरुणावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोएब मणियार रा. सुधानगर, घोटी असे या तरुणाच नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल निलेश विलास साळवे यांच्या फिर्यादी वरून घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वरून काही काळ घोटी येथे तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. घोटी पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र घोटी आणि इगतपुरी पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार होऊ न देता परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. या घटनेनंतर घोटी शहरातून पोलीसांनी रूट मार्च काढत नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या आपत्तीजनक पोस्ट ठेऊ नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी केले आहे.
कांदा निर्यात शुल्क वेळेवर रद्द न केल्याने कांद्याचे बाजार भाव पडले राजू शेट्टी यांचा आरोप…
केवळ चर्चा, बोलणी कधी? शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…