नाशिक: बिनशेती प्रकरणात 35 हजारांची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार व कोतवाल यास रंगेहाथ पकडण्यात आले, तक्रारदार यांचे चुलत आजोबा व इतरांचे पिंपळगाव नजीक मधील गट क्रमांक 13/1/1 पैकी क्षेत्र8300.०० चौरस मीटर क्षेत्र बिनशेती करण्यासाठी विनंती अर्ज केला होता, नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांनी 40 हजारांची लाच मागितली ,तडजोडीअंती 35 हजार रुपयांवर सौदा ठरला होता. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती, प्रशासकीय इमारतीमधील प्रसाधन सभागृहात 35 हजार लाच स्वीकारली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला,पोलीस निरीक्षक अनिल बागूल, पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अजय गरुड, किरण अहिरराव, संतोष गांगुर्डे यांनी ही कारवाई केली,