आयकर विवरणपत्र कुठल्याही स्थितीत वेळेतच भरा

अतिरिक्त आयकर आयुक्त हर्षित बारी यांचे आवाहन

नाशिक : प्रतिनिधी
आयकर व्यवहारांबाबत कर्मचार्‍यांनी दक्ष राहायला हवे. आधार आणि पॅन कार्ड विहित मुदतीच्या आत लिंकिंग असणे, आपला आयकर परतावा वेळेत भरणे आणि आयकर विभागाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे पारदर्शी आर्थिक व्यवहारांसाठी अतिशय गरजेचे आहे. आवश्यकता असेल तेथे कर्मचारी, उद्योजक अथवा नागरिकांना आयकर नियमांसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आयकर विभाग तत्पर आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून नियमांनुसार अचूक वेळेत आयकर परतावा करावा. या शिस्तीमुळे नागरिकांना संभाव्य कारवाईस सामोरे जावे लागणार नाही, असे प्रतिपादन आयकर विभागाचे नाशिक रेंजचे अतिरिक्त आयुक्त हर्षित बारी यांनी केले.

सातपूर येथील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या कर्मचार्‍यांसाठी आयोजित आयकरविषयक जनजागृती सत्रात त्यांनी आयकर विभागाशी संबंधित नवीन कायदे, कर्मचार्‍यांकडून या विभागाच्या असणार्‍या अपेक्षा, नवीन कायद्यातील बदल व संभाव्य परिणाम आदी मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा करीत मार्गदर्शन केले. यावेळी कर्मचार्‍यांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांनाही आयकर विभागातील अधिकारी वर्गाने तपशीलवार उत्तरे देत मार्गदर्शन केले.
यावेळी करतज्ज्ञ भूषण डागा यांनीही कर्मचार्‍यांशी संवाद साधताना आर्थिक साक्षर व कर साक्षर बनण्याचे आवाहन केले. याप्रसंगी आयकर अधिकारी मानसी मूलचंदानी, प्रशांत साळुंके, विमल कुमार मलिक यांनीही यावेळी उत्पन्न कर नियमांबाबतची जागरूकता व विविध शुल्के, आयकर कायद्यांची नियमावली, आयकर परताव्याबाबतचे नियम, आयटी पोर्टल हाताळण्यासाठीचे मार्गदर्शन, जुनी कर प्रणाली व नवीन कर प्रणालीमधील फरक आदी मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. यावेळी महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित असण्यासोबतच ऑनलाइन पद्धतीनेही सहभागी
झाले होते.

आधार-पॅन 31 डिसेंबरपूर्वी लिंक करा

केंद्रीय थेट कर मंडळा(सीबीडीटी)ने दिलेल्या सूचनेनुसार पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक असणे अत्यावश्यक आहे. दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत हे लिंकिंग करणे अनिवार्य आहे. अन्यथा 1 जानेवारी 2026 पासून पॅन कार्ड निष्क्रिय (इनऑपरेटिव्ह) होईल. यामुळे आयटीआर दाखल करणे, कर परतावा मिळवणे, बँकिंग व्यवहार, कर्ज अर्ज आणि उच्च मूल्याच्या खरेदी व्यवहारांवर परिणाम होईल. सीबीडीटीने हे नियम करदात्यांच्या पारदर्शकतेसाठी आणि डुप्लिकेट पॅन रोखण्यासाठी लागू केले आहेत, याबाबतही या सत्रामध्ये आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी माहिती दिली.

सीबीडीटीच्या ‘नड्ज’ मोहिमेची माहिती

सीबीडीटी (केंद्रीय थेट कर मंडळ) च्या माध्यमातून ‘नड्ज’ मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. यामध्ये करदात्यांच्या व्यवहारांच्या तपशिलाचा मागोवा घेतला जातो. नोव्हेंबर 2025 मध्ये या मोहिमेच्या दुसर्‍या टप्प्यास सुरुवात झाली आहे. आर्थिक व्यवहारांमधील पारदर्शकता वाढविणे आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांना आळा घालण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातही या मोहिमेद्वारे पुढील टप्प्यात नियमांचे काटेकोर अंमलबजावणी होईल, अशी माहिती आयटी अधिकार्‍यांनी या सत्रात दिली.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago