सुधाकर बडगुजर यांची शिवसेनेतून हकालपट्टी
नाशिक: प्रतिनिधी
शिवसेनेत नाराज असल्याची भूमिका काल माध्यमांशी बोलताना मांडल्यानंतर आज पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपनेते सुधाकर बडगुजर यांची शिवसेनेतून हकाल पट्टी केली, नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्या पासून बडगुजर हे भाजपात प्रवेश करतील ,अशी चर्चा सुरू झाली होती. त्यातच काल त्यांनी नवीन पदाधिकारीनियुक्ती करण्यात आली तेव्हा आम्हाला विश्वासात घेतले नाही, असा आरोप केला होता. आज पत्रकार परिषद सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांचा सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांना पत्रकार परिषद मध्ये फोन, उपनेते सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी चे आदेश दिले.बडगुजर हे संजय राऊत यांचे राईट हँड म्हणून ओळखले जात असत. या पत्रकार परिषदेत
महानगर प्रमुख विलास शिंदे, खासदार राजभाऊ वाजे, जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी, उपनेते सुनील बागुल, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड उपस्थित होते