पावसाळी नाले साफसफाईला सुरुवात
नाशिक : प्रतिनिधी
अवकाळी पावसाने घातलेल्या थैमानाने नाशिकमधील अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी जमा होऊन पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक भागांत वृक्ष उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे. पावसाळी नाल्यांची वेळीच दुरुस्ती, साफसफाई करण्यात न आल्याने नाले, गटारांचे पाणी थेट रहिवाशांंच्या घरांत घुसले होते. आता नालेसफाईला सुरुवात झाली आहे.
बातमीचा इम्पॅक्ट |
काही दिवसांनीच पावसाळा सुरू होणार आहे. वेळेआधीच जर पावसाळी नाले, गटारांची साफसफाई केली असती तर अशा परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागला नसता. यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या कामकाजाबाबत रोष व्यक्त करत तक्रारी केल्याने का होईना महापालिका प्रशासनाकडून पावसाळी नाले साफसफाई, दुरुस्ती करण्यास सुरुवात झाल्याचे बघायला मिळत आहे.
वरवरच्या साफसफाईने कंत्राटदारांनाच फायदा
अवकाळी पावसाने नाल्यातून वाहणारे पाणी थेट लोकांच्या घरांत, दुकानांत घुसले होते. नवीन सिडको परिसरात 25-30 वर्षांपूर्वी बांधलेले नाले, गटारी कुठे बुजलेले, तर कुठे तुटलेले, फुटलेले व अरुंद आहेत. यातून पाण्याचा निचरा होत नसल्याने केवळ वरवर साफसफाई न करता पावसाळ्यात उद्भवणार्या परिस्थितीनुसार नव्याने अधिक रुंदीचे व खोलीचे पावसाळी नाले करण्यात यावेत. अशा वरवरच्या कामकाजातून नागरिकांचा प्रश्न सुटणार नाही. यामुळे केवळ कंत्राटदारांना आर्थिक फायदा होऊन जनतेचा पैसा पाण्यातच जाणार आहे. याबाबत महापालिकेने त्वरित योग्य त्या उपाययोजना कराव्यात जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांचे हाल होणार नाहीत.
-विजय महाले, स्थानिक रहिवासी
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…