अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निघाला तोडगा
नाशिक : प्रतिनिधी
दोन दिवसांच्या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे.
राज्यभर वेतनवाढीसाठी सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर बुधवारी (दि.4) रात्री मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाला. या दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मुळवेतनात 6 हजार 500 रुपयांची वेतनवाढ करण्यात आली आहे. यांनतर एसटी कृतीसमितीच्या पदाधिकाऱ्यांकडून संप मागे घेण्याचे आवाहन राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे.