लासलगाव येथे बारदान गोदामला आग
लासलगाव:-समीर पठाण
लासलगाव बाजार समितीत शेतकरी निवास येथील बारदान गोदामास आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.आग लागताच बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांची व स्थानिक नागरिकांची एकच धावपळ उडाली
या बाबत मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार लासलगाव बाजार समितीत शेतकरी निवास च्या शॉपिंग सेंटर मध्ये लीलाधर विस्ते यांच्या मालकीचे बारदान गोदाम आहे.या बारदान गोदामास शॉक सर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.या लागलेल्या आगीत अंदाजे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे
या घटनेची माहिती समजताच श्री सिद्धवीर हनुमान मित्र मंडळाचा अग्निशमन टँकर व लासलगाव बाजार समितीचा पाण्याचा टँकर घटनास्थळी तातडीने दाखल झाले.या अग्निशामक टँकरच्या पाण्याच्या प्रेशरच्या सहाय्याने आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.जवळपास एक तास यासाठी अतोनात प्रयत्न करण्यात आले