सिन्नरला डम्पिंग ग्राउंडजवळील भंगार दुकानाला आग

सहा तास आगीचा थरार; जीवितहानी टळली

सिन्नर ः प्रतिनिधी
शहरातील बारागावपिंप्री रोडवर कानडी मळ्याच्या पुढे असलेल्या सिन्नर नगरपरिषदेच्या डम्पिंग ग्राउंडजवळील भंगार दुकानाला काल (दि.16) सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. सिन्नर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 6 तास अथक प्रयत्न करून दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत भंगार व्यावसायिकाचे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शहरातील बारागावपिंप्री रोडवर कानडी मळ्याच्या पुढे असलेल्या सिन्नर नगरपरिषदेच्या डम्पिंग ग्राउंडजवळ लक्ष्मण दशरथ लोंढे यांचे भंगारचे दुकान आहे. काल (16) सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास या दुकानाला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच सिन्नर नगरपरिषदेचा अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचला. अग्निशमन दलाचे जवान लाला वाल्मीकी, नवनाथ जोंधळे, आकाश देवकर, सागर डावरे, वैभव केदार यांनी जीवाची पर्वा न करता आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तथापि या भंगार दुकानात प्लास्टिक डबे, बॉटल, इतर वस्तू तसेच कागदी पुठ्ठे असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे आग विझविण्याच्या कामात सुरुवातीला अडचणी निर्माण झाल्या. त्यावेळी लाला वाल्मीकी यांनी एमआयडीसी अग्निशमन दलाचा एक बंब बोलावून घेतला. दोन्ही अग्निशमन बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. सिन्नर नगरपरिषद व एमआयडीसी अशा दोन्ही अग्निशमन वाहनांच्या सहा फेर्‍या मारण्यात आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले.

Fire breaks out at scrap shop near Sinnarla dumping ground

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *