सातपूरला सिद्धिविनायक पॉलिमरला आग लाखोंचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी नाही
सातपूर: प्रतिनिधी
औद्योगिक वसाहतीतील नाईस संकुल परिसरातील ‘सिद्धिविनायक पॉलिमर’ या कारखान्याला बुधवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. या कारखान्यात प्लास्टिक गोण्यांचे उत्पादन होत असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते, ज्यामुळे जवळचा विद्युत खांबही उन्मळून पडला. सातपूर अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी अर्ध्या तासात शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही, मात्र कारखान्यातील लाखो रुपयांचा कच्चा माल जळून खाक झाला आहे. परिसरात अनेक कंपन्या जवळ असल्याने अग्निशामक दलाने तत्परता दाखवत आग पसरण्यापासून रोखली.
Fire breaks out at Siddhivinayak Polymer in Satpur,nashik, midc,