पिंपळगावी बसवंत शहरात आगीचा तांडव
रद्दीचा, पॅलेटचा कारखाना फ्रेम आणि बांबूचे दुकान जळून खाक .
पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी
पिंपळगाव बसवंत परिसरातील बाबा मंगल कार्याला लगतच्या पिंपळगावी रद्दीचा, पॅलेटचा कारखाना फ्रेम आणि बांबूचे दुकान आणि फरसाण गोडाऊनला भीषण आग लागली रद्दी असल्याने क्षणातच या आगीने रूद्र अवतार घेतला व संपूर्ण परिसर जळुन खाक झाला या आगीत अंदाजे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याबाबत तात्काळ घटनास्थळी पिंपळगाव बसवंत चे माजी सरपंच भास्करराव बनकर सतीश मोरे बापूसाहेब पाटील युवा नेते गणेश बनकर नितीन बनकर यांनी घटनास्थळी भेट दिली तर याबाबत दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे यांनी देखील पिंपळगावच्या घटने संदर्भात आपलं मत व्यक्त केले
या घटनेची सविस्तर माहिती अशी की,मुबंई महामार्ग लागत असलेल्या रद्दीचा, पॅलेटचा कारखाना फ्रेम आणि बांबूचे दुकान छोट्या कारखान्याला ला शुक्रवार दि.२१रोजी काहीतरी शॉट सर्किट ने अचानक पेट घेतला व क्षणातच या आगीने रुद्र रूप धारण केले तातडीने पिंपळगाव अग्निशमन घटनास्थळी पोहचवले व आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करू लागले मात्र आगीचे मोठे डोम असल्याने आग विजवण्यासाठी पिंपळगाव अग्निशामक अपुरे पडत होते त्यानंतर देवळा.निफाड, दिंडोरी, ओझर, नाशिक या ठिकाणच्या नगर परिषद आणि एचएएल ची अग्निशमन जवानांनी तातडीईने दाखल होत फायरप्रूफ असलेली आधुनिक गाड्या आल्या तरीही आग आटोक्यात येत नव्हती शेवटी फोम युक्त पाणी सोडून तब्बल 30 ते 35 बंप पाणी आग आटोक्यात आणण्यासाठी लागली जर पिंपळगाव बसवंतच्या कर्मचाऱ्यांना जर फायरप्रूफ आधुनिक तंत्रज्ञानाच्या गाडीवरील ट्रेनींग जर मिळाली तर काही मिनिटातच आग विजवली असती व नुकसान कमी झाले असते अशी भावना नागरिक व्यक्त करत होते.
चौकट
पिंपळगाव बसवंत परिसरातील एनडीसी सी कॉलनी परिसरात आणि कुरणाची आग ताजी असताना पुन्हा बाबा मंगल कार्यलया परिसरात आग लागल्याने पिंपळगाव महावीरण विभागाच्या गलथन कारभाराची बाबा समोर येत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
………..
तीन सिलेंडरचा स्फोट…
पिंपळगाव बाबा मंगल कार्यालय जवळ तसेच बांबूंच्या दुकानाला भीषण आग लागली त्यात फरसाणचे गोडाऊन देखील जळून खाक झाले त्यात काही गॅस सिलेंडर होत्या त्या जवळपास गॅस सिलेंडरचा देखील स्फोट झाला सुदैवाने त्या सिलेंडर हवेत उडाल्या जर त्या नागरिकांच्या दिशेने आल्या असता तर मोठी जीवित हानी झाली असती
……
लोकांच्या हलगर्जीपणामुळे आगीने घेतले रुद्र रूप…
परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागली ती आग विजवण्यासाठी अग्निशामक जवान प्रयत्न करत होते मात्र नागरिकांनी रस्त्यात गाड्या लावून ठेवल्याने अग्निशामक कर्मचाऱ्यांच्या अग्निशामक बंप त्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती तर सर्विस रोडला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रस्त्यावरच वाहने लावून आग पाहण्यासाठी गेले होते परिणामी अग्निशामक कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला यावेळी पोलिसांनी आणि काही तरुणांनी रस्ता मोकळा करण्यासाठी मदत केल्याने आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक कर्मचाऱ्यांना मदत झाली.
…..
दहा गाड्या दाखल तरीही आग आटोक्यात येईना
पिंपळगाव बसवंत शहरातील बाबा मंगल कार्यालयाजवळ लागलेली भीषण आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक बम कमी पडत होते त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नगर परिषदेच्या अग्निशामक पंप त्या ठिकाणी दाखल झाल्या होत्या यावेळी जवळपास दहा अग्निशामक बंब आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होत्या मात्र तरीही आग आटोक्यात येत नव्हती जवळपास चार ते पाच तास आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक जवानांना प्रयत्न करावे लागले.
………
रुग्णालय आणि रेसिडेंटल परिसर तरीही कारखाने
बाबा मंगल कार्यालय तसेच परिसरात पाच ते सहा मोठे रुग्णालय आहे आणि हा परिसर रेसिडेंटल एरिया आहे मात्र या परिसरात असे अवैध कारखाने स्थापन करण्यात आले याला परवानगी देण्यासाठी प्रशासनाने तेथील स्थनिक नागरिकांची परवानगी घेतली का.? ही चर्चा रंगली आहे.
…..
एक वर्षांपूर्वी गादीचा कारखाना जळून खाक
एक वर्षांपूर्वी या ठिकाणी अवैधरित्या स्थापन केलेल्या गादीच्या कारखान्याला भीषण आग लागून परिसर मोठ्या प्रमाणात आगीत खाक झाला होता ही आग हा ही घटना घडूनही प्रशासनाने या परिसरात अशी अवैधरित्या असवेदनशील कारखाने तसेच व्यवसाय स्थापन करून देऊ नये यासाठी कोणतीही भूमिका घेतली नाही त्यामुळे पुन्हा एकदा या आगीने तांडव धारण करून हा परिसर जाळून खाक केला आहे त्यामुळे आता तरी प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
…..
पिंपळगाव बसवंतच्या अग्निशमन कर्मचाऱ्यांना ट्रेनिंगची गरज
पिंपळगाव शहरात गेल्या दोन दिवसापासून सातत्याने आग लागण्याची घटना घडत आहे मात्र सदर कर्मचाऱ्यांना कोणतीही ट्रेनिंग नसल्याने हे कर्मचारी आग विजवण्यास असक्षम ठरत आहे गुरुवार रोजी सायंकाळी एका गोडाऊनला आग लागली होती मात्र त्या गोडाऊन पर्यंत गाडी घेऊन जाण्यासाठी रस्त्याला कोणतीही वाहन नसताना सदर गाडी रस्त्याच्या बाजूने फसली हे केवळ अग्निशामक कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे झाले तर शुक्रवारी रोजी आग लागली त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना पाईपला नोझल पण लावता येत नव्हते आणि अत्याधुनिक वाहन आहे ते देखील व्यवस्थित ऑपरेट करता येत नव्हते त्यामुळे फक्त फक्त एक कर्मचाऱ्याला ट्रेनिंग देऊन उपयोग नाही सर्वच कर्मचाऱ्यांना ट्रेनिंगची आवश्यकता आहे..
……
गॅसच्या टाक्या सुरक्षित ठिकाणी हलवल्या…..
हा परिसर रेसिडेंट एरिया असल्याने परिसरात सातत्याने आग लागण्याची घटना घडतं आहे त्यामुळे येथील नागरिक जीव मुठीत धरून राहतात शिवाय या परिसरातील रुग्णालय असल्याने शुक्रवारी लागलेल्या आगीच्या घटनेने तीन सिलेंडरचा स्फोट झाला तेव्हा परिसरातील नागरिकांनी आपल्या घरातील आणि रुग्णालयातील गॅस आणि ऑक्सिजनच्या टाक्या तात्काळ हलवल्या.
सिडको : विशेष प्रतिनिधी दहा रुपयाचे सिगारेट 11 रुपयाला का विकतो, याचा जाब विचारल्याने टपरी…
बोधलेनगरला बांधकाम व्यावसायिकाने खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका नाशिक : प्रतिनिधी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या…
अंबरनाथमध्ये आठ वर्षाच्या बालकावर चार अल्पवयीन मुलांचा सामुहिक लैंगिक अत्याचार शहापूर : साजिद शेख कुटुंबीयांसमवेत…
मोखाड्यात सहा दिवसांत दुसरा मृतदेह सापडला गोणीत बांधलेल्या स्थितीत आढळला युवतीचा मृतदेह मोखाडा: नामदेव ठोमरे…
सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक माजी सभापती संजय सोनवणे यांचा करिष्मा मातब्बरांना लोळवत नऊ…
दिल्लीत देशभरातील बांधकाम कामगारांचे धरणे आंदोलन नाशिक जिल्हातील बांधकाम कामगारांचाही सहभाग नाशिक : प्रतिनिधी आयटक…