वाळू वाहणाऱ्या ट्रॅकला  आग

संपूर्ण ट्रक जळून खाक

 

 

पंचवटी : वार्ताहर

 

वाळू वाहणाऱ्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. पोलिसांच्या प्रसंगसावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलास यश मिळाले आहे. यात ट्रक संपूर्ण जळून खाक झाला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई आग्रा महामार्गावरील आडगाव जवळील देवी इंजिनिअरिंग वेल्डिंग वर्कशॉप आहे. या ठिकाणी सोमवार (ता.०६)  अशोक कुमार (रा. इटावा, उत्तरप्रदेश) यांचा वाळू मालं वाहतूक ट्रक यूपी ७५ एटी ०५२६ पत्रा वेल्डिंग काम करणेसाठी आला होता. वेल्डिंग काम सुरू करण्यापूर्वी ट्रकचे बॅटरीचे वायरिंग काढण्यास कामगार यास विसर पडला. यामुळे पत्रा वेल्डिंग काम सुरू करतात गाडीने पेट घेतला. या घटनेची माहिती आडगाव गुन्हे शोध पथक त्यांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत प्रथम या इंजीनियरिंग वर्कशॉपच्या बाजूस असलेल्या खाजगी कंपनीच्या पेट्रोल पंपावरील वीजपुरवठा खंडित करण्यास सांगितले. तेथील पेट्रोल भरण्याचे कामकाज बंद केले. घटनास्थळी के के वाघ येथील अग्निशामक दलाचे ब्रिगेड  फायरमन आर व्ही पाटील, आर डी सोनवणे, व्ही जी चव्हाणके, वाहनचालक डी ए धोत्रे यांनी आग आटोक्यात आणली.

 

 

 

यांच्या प्रसंगसावधानतेमुळे टळला अनर्थ

 

 

घटना मालवाहतूक ट्रकला आग लागली बाजूस खाजगी कंपनीचा पेट्रोल पंप कुठलाही अनर्थ घडू नये यासाठी घटनास्थळी  पोहोचताच आडगाव पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक भास्कर वाढवणे, पोलिस हवालदार देवराज सुरंजे, पोलिस अंमलदार दिनेश गुंबाडे यांनी यांनी दाखविले प्रसंगावधान दाखविले.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *