महाराष्ट्र

काम न करणार्‍यांना काढून टाका

पुण्यात राज ठाकरे यांचा सज्जड दम

पुणे :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्यातील शाखाध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांच्या बैठकीत पक्षातील निष्क्रियतेवर जोरदार संताप व्यक्त केला. काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा… इतके दिवस काय केले दाखवा… आणि जे काम करत नाहीत त्यांना थेट काढून टाका, या शब्दांत राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकार्‍यांना चांगलाच सज्जड दम
दिला.
पुण्यातील संकल्प हॉलमध्ये झालेल्या या बैठकीला शहरातील सर्व शाखाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज ठाकरे स्वतः पक्षाच्या संघटनात्मक कामावर आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. बैठकीत सुरुवातीलाच राज ठाकरेंनी एका वरिष्ठ पदाधिकार्‍याला त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून फटकारले.
‘मुळशी पॅटर्न’ फेम रमेश उर्फ पिट्या परदेशी, हे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि शाखाध्यक्ष आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा फोटो पाहून राज ठाकरे चांगलेच संतापले. त्यांनी थेट विचारलं की, छातीठोकपणे सांगत होता मी संघाचा कार्यकर्ता आहे, कशाला टाइमपास करतो. एकाच ठिकाणी कुठे तरी राहा, असे म्हणत राज ठाकरेंनी रमेश परदेशी यांना झापले.

काम न करणार्‍यांना काढून टाका
राज ठाकरे यांनी पदाधिकार्‍यांना सज्जड दम दिला. काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा, असे म्हणत राज ठाकरे यांनी शाखाध्यक्षांना फटकारले. इतके दिवस काय काम केले हे दाखवा, मतदार याद्या पूर्ण का केल्या नाहीत? असा प्रश्न राज ठाकरेंनी पदाधिकार्‍यांना विचारला. तर ज्यांनी काम केले नाही त्यांना काढून टाकण्याचे आदेशदेखील राज ठाकरेंनी दिले. या फटकारणीनंतर सभागृहातील अनेक शाखाध्यक्ष आणि पदाधिकारी गप्प बसले, काहींनी तर माना खाली घातल्याचे पाहायला मिळाले.

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

2 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

2 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

2 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

2 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

2 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

2 hours ago