नाशिकरोडला दोन गटात राडा
मध्यरात्री गोळीबार, पाच जण गंभीर जखमी दोघे ताब्यात
नाशिक : प्रतिनिधी
दोन दिवसापूर्वी नाशिकरोड येथील मुक्तीधाम मागे असलेल्या हॉटेल मथुराचे नितीन सचदेव यांच्यावर कोयता आणि रॉडने मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि.30) जुन रोजी रात्री विहितगाव परिसरातील मथुरा चौक येथे दोन गटात तुफान राडा झाला.
यात एक गटाकडून युवकावर गोळीबार केल्याने एकाच्या मांडीला गोळी लागली. तर राड्यात झालेल्या मारहाणीत चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नाशिकरोड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान उपनगर पोलिसांनी गोळीबार आणि मारहाण प्रकरणात दोघा सशयि्यांना ताब्यात घेतले आहे. देवळाली गाव येथे राहणाऱ्या आकाश सोमनाथ पवार यांच्या मांडीला गोळी लागली आहे. जुन्या कुरापतीवररूनन झालेल्या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत.दरम्यान नाशिक शहरात मोठ्या प्रमाणत गुन्हेगारांचे टोळके फोफावत असून पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक बसवावा तरच शहरात शांतता होईल. गोळीबाराची माहिती मिळताच उपनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गोळीबार आणि हल्ल्या प्रकरणी दोन आरोपींना उपनगर पोलिसांनी अटक केली आहे. हल्ला कशामुळे झाला आणि गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक कुठून आली याचा अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.
पोलिसांपासून बचाव करण्यासाठी त्याने बदलले तब्बल 65 सिमकार्ड तीन वर्षांपासून फरार पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला अटक…
डम्परच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यातील चांदोरी जवळ आज दि…
राजकारणात सध्या एक ट्रेंड सुरू असून, पक्षाला जोपर्यंत सुगीचे दिवस आहेत तोपर्यंत पक्षाशी आपण किती…
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला आहे. प्रत्येक…
नीट परीक्षेत अपेक्षेइतके गुण मिळाले नाहीत म्हणून साधना भोसले या पोटच्या मुलीला मुख्याध्यापक असलेल्या पित्याने…
इंदापुरात अविस्मरणीय रिंगण सोहळा इंदापूर : पंढरपूरला निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा काल…