नाशिक : प्रतिनिधी
शहरातील एका नामांकित बिल्डरच्या घरावर दोन युवकांनी गोळीबार केल्याची घटना आज पहाटे घडली, म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. गोळीबाराचा हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. दहशत निर्माण करण्यासाठी हा प्रकार केला असल्याचे बोलले जात असून सीसीटीव्ही च्या मदतीने पोलीस या युवकांचा शोध घेत आहेत.
Video Player
00:00
00:00
शहरात गेल्या काही दिवसांपासून टवाळखोर आणि कोयता धारी गुंडांनी मोठा धुमाकूळ घातला आहे. सिडकोत दोन दिवसांपूर्वी कोयत्याने तीन युवकांवर हल्ला केला होता. तर काल सकाळी श्रमीकनगर भागात गाड्यांची तोडफोड झाली होती, त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.