नाशिक केंद्रातून ‘काळाच्या पंजातून’ प्रथम

नाशिक : प्रतिनिधी
64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून विजय नाट्यमंडळ, नाशिक निर्मित ‘काळाच्या पंजातून’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. परिवर्तन बहुद्देशीय संस्था, नाशिक यांच्या ‘कूच कूच’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक, तर लोकहितवादी मंडळ, नाशिक यांच्या ‘प्रतिषिद्ध’ या नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले आहे.
तिन्ही विजेत्या नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. 5 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे झालेल्या या स्पर्धेत एकूण 25 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. परीक्षक म्हणून सुधाकर पाटील, रवींद्र नंदाने आणि शोभना मयेकर यांनी काम पाहिले.

यांना मिळाले पारितोषिक

दिग्दर्शन
प्रथम : वरुण भोईर – काळाच्या पंजातून
द्वितीय : नूतन गोरे-पगारे – कूच कूच
तृतीय : मुकेश काळे – प्रतिषिद्ध
प्रकाशयोजना
प्रथम : कृतार्थ कंसारा – काळाच्या पंजातून
द्वितीय : रवींद्र रहाणे – कूच कूच
तृतीय : विनोद राठोड – नेबर, प्लंबर आणि ती
नेपथ्य
प्रथम : किरण भोईर – काळाच्या पंजातून
द्वितीय : आदित्य समेळ – प्रतिषिद्ध
तृतीय : स्वरूप बागूल – गंमत असते नात्यांची
रंगभूषा
प्रथम : दत्ताजी जाधव – काळाच्या पंजातून
द्वितीय : माणिक कानडे – कूच कूच
तृतीय : तितिक्षा मोरे – नेबर, प्लंबर आणि ती
संगीत दिग्दर्शन
प्रथम : आनंद अत्रे – तुका  /  नामा
द्वितीय : प्रथमेश पाडवी – प्रतिषिद्ध
तृतीय : भूषण भावसार – शिनेमा
वेशभूषा
प्रथम : संजय जरीवाला – काळाच्या पंजातून
द्वितीय : कृष्णा शिंदे – कूच कूच
तृतीय : सुरेखा लहानगे – मिशन 21
उत्कृष्ट अभिनय-रौप्यपदक
अमोल थोरात – काळाच्या पंजातून
मानसी मारू – नेबर, प्लंबर आणि ती
अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्रे
सृष्टी शिरवाडकर, भावना कुलकर्णी, तनिषा जाधव, सायली बोंडगे, रेवती अय्यर, भगवान निकम, सागर संत, रोहित पगारे, भरत कुलकर्णी आणि योगेश वाघ या प्रतिभावान कलाकारांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *