राकेश शर्मा हे अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय आहेत. भारताचा पहिला आणि जगाचा 138 वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला, तो दि. 2 एप्रिल 1984 रोजी. भारत-रशिया अवकाश संशोधन मंडळ कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूझ टी-11 यानातून दोन रशियन अंतराळ संशोधकांसमवेत राकेश शर्मा यांनी अवकाश सफरीचा अनुभव घेऊन या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन भारतीयांसाठी खुले केले.
राकेश शर्मा यांचा जन्म दि. 13 जानेवारी 1949 रोजी पतियाळा, पंजाब, भारत येथे झाला. ते एक भारतीय लष्करी वैमानिक आणि अंतराळवीर, अंतराळातील पहिले भारतीय नागरिक आहेत. सन 1970 मध्ये शर्मा भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून रुजू झाले. सन 1971 च्या बांगलादेश युद्धात त्यांनी मिग-21 मध्ये 21 लढाऊ मोहिमा केल्या. सन 1982मध्ये त्यांची सोव्हिएत- भारतीय संयुक्त अवकाशयानासाठी अंतराळवीर म्हणून निवड झाली. दि. 3 एप्रिल 1984 रोजी त्यांनी दोन सोव्हिएत अंतराळवीर, कमांडर युरी मालिशेव्ह आणि फ्लाइट इंजिनिअर गेनाडी स्ट्रेकालोव्ह यांच्यासोबत सोयुझ टी-11 वर उड्डाण केले. ते अंतराळ स्थानक सॅल्युट-7 वर गेले. तेथे शर्मा यांनी अंतराळातून भारताचे छायाचित्रण आणि अभ्यासासाठी व्यायामाचा समावेश असलेले प्रयोग केले.
वजनहीनतेच्या वेळी योगाचे शरीरावर होणारे परिणाम. हे मिशन जवळपास आठ दिवस चालले आणि शर्मा आणि त्यांचे क्रू सोबती 11 एप्रिल रोजी कझाकस्तानमध्ये दाखल झाले. सन 1987 मध्ये ते भारतीय कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये मुख्य चाचणी पायलट म्हणून रुजू झाले. सन 2001 मध्ये त्यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स सोडले आणि बेंगळुरू येथील प्रक्रिया-व्यवस्थापन कंपनी, ऑटोमेटेड वर्कफ्लोच्या बोर्डाचे अध्यक्ष झाले. राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो? या प्रश्नाला त्यांनी ’सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ असे अभिमानी उत्तर दिले होते. पतियाळात जन्मलेले राकेश भारतीय वायुदलात वैमानिक होते. नंतरच्या काळात त्यांचा अशोकचक्र देऊन सन्मान केला गेला.
राकेश शर्मा भारतीय एअर फोर्समध्ये विंग कमांडर होते. वयाची 23 वर्षे पूर्ण करण्यापूर्वीच त्यांनी मिग-21 या फायटर जेटमधून 21 वेळा उड्डाण केले होते. भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांचा आज वाढदिवस. दि. 13 जानेवारी 1949 रोजी पटियाळामध्ये त्यांचा जन्म झाला होता. दि. 3 एप्रिल 1984 रोजी अंतराळात पोहोचणारे पहिले भारतीय होण्याचा मान त्यांनाच मिळाला होता. सुमारे आठ दिवस ते अंतराळात राहिले होते. सन 1982 साली त्यांची अंतराळ यात्रेसाठी निवड झाली. इस्रो आणि सोव्हिएत संघ यांच्या संयुक्त मोहिमेंतर्गत सोयुझ टी-11 या यानातून ते अंतराळात गेले होते.
सोयुझ टी-11 मधील क्रूसोबत एका जॉइंट कॉन्फरन्समध्ये भारताने पहिल्यांदाच अंतराळातील आपल्या नागरिकासोबत गप्पा मारल्या होत्या. यावेळी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विचारलं होतं, की अंतराळातून भारत कसा दिसतोय? यावेळी उत्तर देताना राकेश शर्मा हिंदीतून म्हणाले होते, सारे जहाँ से अच्छा!
राकेश शर्मांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की सोयूज यानाच्या प्रक्षेपणाच्या दिवशी त्यांना अगदीच ’बोअरिंग’ वाटत होतं. या क्षणाचा सराव त्यांनी बर्याच वेळा केला होता. त्यामुळे त्या दिवशीही अगदी रुटिन असल्याप्रमाणेच सगळं पार पडलं, असं ते सांगतात. ते सध्या काय करतात? या आपल्या प्रश्नाचे उत्तर- राकेश शर्मा हे सध्या कुन्नूर नावाच्या एका छोट्या गावात आपल्या पत्नीसोबत राहतात. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर अगदी साधं आयुष्य ते जगत आहेत. अर्थात, ते अंतराळ मोहिमांपासून नक्कीच दूर झाले नाहीत. ते सध्या इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी सल्लागार म्हणून मदत करत आहेत. गगनयान मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदाच स्वतः स्पेसमध्ये अंतराळवीर पाठवणार आहे, हे विशेष!
अंतराळवीर राकेश शर्मा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
First Indian to go into space