आधी केला प्रेमविवाह अन नंतर केले असे काही…  कुठे घडली ही घटना? सीसीटीव्हीत संपूर्ण प्रकार कैद

आधी केला प्रेमविवाह अन नंतर केले असे काही…
कुठे घडली ही घटना? सीसीटीव्हीत संपूर्ण प्रकार कैद
सिन्नर : प्रतिनिधी
वैदिक पद्धतीने लग्न केल्यानंतर १९ वर्षीय पत्नी किरकोळ कारणावरून नवऱ्याशी न पटल्याने माहेरी गेली.‌ आईमुळेच बायको नांदायला येत नसल्याचा पतीचा समज झाला. त्याच रागातून त्याने आई सोबत रस्त्याने पायी जाणाऱ्या पत्नीचे तीन मित्रांसह एका कारमधून अपहरण केल्याची घटना तालुक्यातील पांगरी येथे दोन दिवसांपूर्वी घडली. दरम्यान, अपहृत नवरी सह तिच्या पतीला पोलिसांनी शिर्डी येथून ताब्यात घेत अटक केली आहे. भविष्याचा विचार करून दोन्ही बाजूकडून या प्रकरणी समेट घडवत पडदा टाकण्यात आला. दुसरीकडे पोलिसांची मात्र या प्रकरणी चांगलीच दमछाक झाली. त्यामुळे या अनोख्या अपहरणाची चर्चा परिसरात रंगली आहे.
पांगरी येथील एका १९ वर्षीय तरुणीने आई-वडिलांच्या इच्छे विरोधात २० जानेवारी २०२५ रोजी गावातीलच वैभव अण्णासाहेब पवार (२३) या तरुणाशी वैदिक पद्धतीने विवाह केला. ती त्याच्या सोबतच राहत असताना अचानक दोघांमध्ये किरकोळ भांडण झाले. त्यातून ती माहेरी आली. ती पुन्हा सासरी येत नसल्याचे बघून नवऱ्याने तीन मित्रांना सोबत घेत बुधवारी (दि.१९) दुपारी १२.३० वाजता पांगरी बस स्थानक परिसरात ही मुलगी आई आणि भावासोबत पायी जात असताना आईला ढकलून देत मुलीला कार मध्ये घालून तीचे अपहरण केले. दरम्यान, अपहरणाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. वावी पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आल्यानंतर त्यांच्याकडूनही तपास चक्र वेगाने फिरली. अशातच तरुणाने या मुलीला प्रारंभी संगमनेर येथे कारने नेत तेथे तिला उतरून घेत तीन मित्रांना कारसह माघारी पाठवून दिले. त्यानंतर या पती-पत्नीने बसने लोणी आणि नंतर शिर्डी येथे प्रवास केला. तिथून ते गावी परतत असताना वावी पोलिसांनी त्यांचे लोकेशन ट्रॅक करत शिर्डी येथून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून नवऱ्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या संदर्भात वावी पोलिसांनी तरुणाला अटक केली असून त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, रागा वैतागत नवऱ्याविरोधात अपहरणाची फिर्याद दिलेली मुलगीच गजाआड असलेल्या पतीला जेवणाचा डबा घेऊन आल्याने पोलिसांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली. अपहरणात त्याला मदत करणाऱ्या तीन संशयीतांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी दिली.
त्या मित्रांचा शोध सुरू…
एक्सयुव्ही ३०० कार मधून या मुलीचे अपहरण करण्यासाठी मदत करणाऱ्या वैभव पवार याचे तीन मित्र या प्रकरणात पोलिसांसमोर आरोपी म्हणून उभे टाकले आहे. प्रेमविवाह झालेल्या या दोघांचा संसार सुरळीत चालावा म्हणून मदतीच्या भावनेने गेलेले ते तीन मित्र पोलिसांच्या लेखी अपहरणातील आरोपी झाले आहेत. पोलिस त्यांच्या मागावर असून मित्राला केलेली ही मदत त्यांना मात्र गुन्हेगारीचा डाग लावणारी ठरणार आहे.
Bhagwat Udavant

Recent Posts

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

23 minutes ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

32 minutes ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

11 hours ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

19 hours ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

19 hours ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

19 hours ago