नाशिक

घरफोडी, चोरी, अवैध शस्त्र बाळगणारे पाच गुन्हेगार अटकेत

गुन्हे शाखा युनिट-2 ची यशस्वी कारवाई

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक शहरातील घरफोडी, चोरी, तसेच अवैध शस्त्र बाळगणार्‍या गुन्हेगारांविरोधात कारवाई करत गुन्हे शाखा युनिट- 2 ने तीन वेगवेगळ्या प्रकरणांत एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन धारदार तलवारींसह मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहेत.

अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी अमोल गायकवाड व स्वप्नील जाधव हे पाथर्डीगाव परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली. चौकशीअंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अंबड पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी हजर करण्यात आले. पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करताना चोरी गेलेला मोबाइल गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने तातडीने मालेगाव येथे जाऊन आरोपी सुफीयान रौफ शहा, सगीर अन्सारी व मोहम्मद अमीन अब्दुल रहीम यांना अटक केली. त्यांच्याकडून दहा हजार रुपयांचा मोबाइल हस्तगत करण्यात आला. आरोपींना पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्हे शाखा युनिट-2 च्या अधिकार्‍यांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश नवाळे चिंचोली फाटा परिसरात हातात धारदार तलवार घेऊन फिरत होता. त्यास तत्काळ अटक करून त्याच्या ताब्यातून दोन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, प्रेमचंद गांगुर्डे, बाळू शेळके, विलास गांगुर्डे, पोलीस हवालदार संजय सानप, नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मीक चव्हाण, महेश खांडबहाले, संजय पोटिंदे यांचा सक्रिय सहभाग होता.

 

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

11 hours ago