राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

अश्लील कंटेंट दाखवणार्‍या पाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी

नियमांकडे दुर्लक्ष केल्याने केंद्र सरकारचा डिजिटल स्ट्राइक

नवी दिल्ली :
केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशात पाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी आणली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने MoodXVIP, Koyal PlayPro, Digi Movieplex, Feel  आणि  Jugnoo वर देशात पूर्णपणे बंदी आणली आहे. नियम 2021 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. अश्लील कंटेंट दाखवत असल्याने सरकारकडून या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे.
इशारा देऊनही सुधारणा नाही
ही कारवाई अचानक नव्हती. सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये या प्लॅटफॉर्मना नोटिसा पाठवून त्यांना सुधारणा करण्याचा इशारा दिला. काहींनी नोटिशांना प्रतिसादही दिला नाही, तर काहींनी हुशारीने त्यांचे डोमेन नाव बदलले किंवा तेच जुने कंटेंट स्ट्रीमिंग सुरू केले. फेब्रुवारी 2025 मध्येही सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मना नैतिकता संहिता पाळण्याची आठवण करून देण्यात आली होती; परंतु सुधारणा होण्याऐवजी हे पाचही प्लॅटफॉर्म नियमांकडे दुर्लक्ष करत राहिले. त्यामुळे आता सरकारने मोठा निर्णय घेत या पाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर कायमची बंदी
आणली आहे.
सरकारने आयटी (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता) नियम, 2021 चा वापर करून हे स्पष्ट केले आहे की, ओटीटी प्लॅटफॉर्म अनियंत्रित नाहीत. आता असं दिसून येते की, सरकार आता केवळ तक्रारींची वाट पाहत नाही तर त्यांच्यावर सक्रियपणे लक्ष ठेवत आहे. सरकारच्या या कारवाईमुळे जे बोल्ड कंटेंटवर आधारित सबस्क्रिप्शन विकत होते असे लहान आणि नोंदणी नसलेल्या ओटीटी अ‍ॅप्सना अडथळा निर्माण होणार आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

4 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

4 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

4 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

4 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

4 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

5 hours ago