नवी दिल्ली: पाच राज्यातील निवडणुकीचे बिगुल वाजले असून मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी निवडणूक तारखा जाहीर केल्या, त्यानुसार मध्यप्रदेश मध्ये एकाच वेळी 17 नोव्हेंबरला तर राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये सात आणि 17 नोव्हेंबरला हे मतदान होईल तर मिझोरम मध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून सात नोव्हेंबरला, तर तेलंगणा मध्ये 30 नोव्हेंबर ला मतदान होईल . पाचही राज्यांचा निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार आहे राजस्थानमध्ये सध्या काँग्रेसची तर मध्य प्रदेश मध्ये भाजपची सत्ता आहे त्यामुळे राजकीय पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत यापूर्वीच मध्य प्रदेश मध्ये काही उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे त्यामध्ये अनेक केंद्रीय मंत्र्यांना यावेळेस विधानसभेच्या रिंगणात उतरण्यात येणार आहे