फुलव पिसारा नाच… टाकळी विंचूरला नाचणारा मोर पाहिला का?

टाकळी(विंचूर)येथे मोर नाचतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद

लासलगाव :- समीर पठाण

सर्वत्र रिमझिम पाऊस पडताच बदल झालेल्या वातावरणाने सर्वच आनंदी झाले आहेत.निसर्गाच्या या बदललेल्या मनोहारी रुपाला प्राणी पक्षी सुध्दा
प्रतिसाद देताना दिसत आहे.या नैसर्गिक वातावरणात शेतात नाचणारा मोर फारचं क्वचित बघायला मिळतो त्यासोबतच मोर पिसारा देखील फुलवताना दिसतात. असेच लासलगाव जवळ टाकळी येथे वन्य प्राणी मित्र भागवत झाल्टे यांच्या शेतात नाचणाऱ्या मोराचे मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

पावसामुळे हिरवीगार झालेली शेती,नैसर्गिक वातावरणात पसरलेला गारवा याचा आनंद घेताना हरणाच्या कळपाने सुध्दा घेतला आहे.चांदवड तालुक्यातील कातरवाडी गावामध्ये बऱ्यापैकी निसर्गाची मेहरबाणी झाल्यामुळे चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली असून वन्य प्राणी देखील निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत.हरणांचा मोठा कळप देखील निर्भीडपणे मुक्तसंचार करत असतांना चे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.कातरवाडी डोंगराळ परिसरात रिमझिम पावसामुळे हरीण पावसाचा मुक्तानंद घेत असतांनाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *