‘फार फार तर वारा
बाहेरून येईल
पण फुलून तर
आतूनच यावे लागते..’
कविवर्य संजय चौधरी यांच्या कवितेच्या वरील ओळी खूप आवडल्या. खरंच.. फुलणे हा तर फुलाचा प्राकृतिक धर्म आहे..कळी फुलली की तिचे सौंदर्य अधिकच खुलते.तसंच माणसालाही आतून आतून फुलून येता आले पाहिजे..फुलण्यासाठी अनुकूल परिस्थिती असेल किंवा नसेलही पण मनात मात्र आस हवी फुलण्याची..उमलण्याची..!!
आसक्ती हवी की हो मला आनंदी राहायचेच आहे..मग वार्‍याची तरी का वाट पाहावी बरं..? तुम्ही ती बांधावरची रानजाई पाहिली आहे का..? कितीही ऊनवारा पाऊस असला तरी ती बहरत असते..तिला कुणी पाणी नाही घातले तरी ती जगते..जमिनीतल्या ओलाव्याने तग धरते..काही व्यक्ती देखील अशाच असतात..त्यांना आयुष्यात अभावानेच प्रेम कोडकौतुक मिळत असते तरी देखील ते आनंदाच्या बिया वाटत फिरतात..स्वतः आनंदी तर असतातच, पण इतरांच्या जीवनात देखील आनंद परत जातात..आजूबाजूला खुपशी नकारात्मक माणसे असतात ज्यांच्याशी सततच जुळवून घ्यावे लागते..जुळवून घेतात ते कारण त्यांचे अंतःकरण नेहमीच स्नेहभावनेने फुलून आलेले असतेत्यांना कटुता नको असते..नाही बोलून दाखवत ह्याचा अर्थ असा नसतो की त्यांना काहीच समस्या नाही..इथे प्रत्येकालाच काही ना काही दृश्य अदृश्य व्याप आहेत.
खर्‍या अर्थाने फुलून येतात ते निसर्गातील ऋतू जे आपल्या आयुष्यात देखील असतात..उन्हाळ्यातील रखरखीत माळरान पावसाळा आला की हिरवेगार दिसते आणि मनाला भुरळ घालते.
कधी सुखाचे सोहळे तर कधी दुःखाचे रडगाणे..कधी ऊन तर कधी पाऊस..कालचे दिवस आज राहत नाही..दिवस बदलतात..अकबर बादशहाच्या हिर्‍याच्या अंगठीत एक छोटासा कागद असतो ज्यावर लिहिले असते की ये दिन भी निकल जाएंगे ..वाक्य द्विअर्थी आहे की सुखाने मातू नकोस आणि दुःख असल्यास कोलमडू नको..काळ बदलत जातो तसे आपणही काही अंशी बदलण्यास काय हरकत आहे..? तेच ते भोज्जे असले तरी नव्याने त्यांना शिवण्यात मजा आहे.. कंटाळून चालतच नाही..
आपण मात्र जीवनगाणे गातच जायचे आहे.
आणि जीवनाचा मळा फुलवत जायला हवा..मग त्या बहरऋतूला आपण आवडायला लागतो आणि क्षण कसे आनंदाने फुलून येतात..निसर्ग शिकवत असतो आपल्याला असे जगण्याचे तत्वज्ञान ..!!!

Flower…

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

3 hours ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

3 hours ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

3 hours ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

3 hours ago

बांगलादेशमधील सत्तांतर

दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…

3 hours ago

कृत्रिम बुद्धिमत्तेचा आविष्कार

भारत हा विकसनशील देश आहे. अवघ्या सत्तर एक वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळालेल्या भारताला सुरुवातीलाच पंडित जवाहरलाल…

3 hours ago