आधुनिकतेच्या निमित्ताने माणसाने आपली प्रगती साधली आहे. अवघड गोष्टी करण्यासाठी काही वेळा अनेक माणसांची शक्ती वापरावी लागायची. तिच काम आता यंत्राने सहज होत आहेत.
 जिज्ञासू वृत्तीमुळे, तंत्रज्ञान जाणुन घेण्याच्या उत्सुक स्वभाव निमित्त झाल्यामुळे प्रगती आणि आत्मविकास साधता येतो. काही नवीन शिकण्यासाठी उत्सुकता, उत्साह, एकाग्रता अशा बऱ्याच गोष्टी जवळ असाव्या लागतात.
जीवनात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी मनात आणि शरिरात चांगल्या गोष्टींना योग्य निमित्त करून स्थान द्यावे लागते. तरच काही तरी अद्भुत गोष्टी निर्माण होत असतात.
 पुर्वीच्या काळी काही निमित्त कारणाने पत्र लिहून ख्याली खुशाली विचारण्याची पध्दत होती. आता काळ बदलला आहे. आधुनिकता वाढली अन् सर्व काही सोपं झालं आहे.
 कितीही दुरवर राहत असलेल्या व्यक्तीचं दर्शन दुसऱ्या व्यक्तीला सहज होत आहे. इतक यशस्वी होऊन ही कुणाच्या भावना कुणी सहज ओळखू शकत नाही हेच काय ते खरं!!!
  अलिकडच्या काळात माणसांची मानसिकता बदललेली दिसते. काही निमित्त असेल तेव्हा माणसांची स्वार्थी वृत्ती ओळख, गरज दाखवताना दिसते. नाही तर तु कोण??? असा आविर्भाव असतो वागण्यात.
गर्व करायलाही, त्याच हरण होण्यासाठी, हसण्यासाठी, रडण्यासाठी, भांडण्यासाठी, शांत राहण्यासाठी, अडथळा आणण्यासाठी, समस्यांमधुन बाहेर निघण्यासाठी, जगण्यासाठी, मरण्यासाठी कुणी कुणाच्या तरी आयुष्यात निमित्त ठरत असते.
 एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार करण्यासाठी मग त्याच्या कुठल्या नसलेल्या गोष्टीचा म्हणजे एकंदरीत काय रंग, रुप, परिस्थिती निमित्त तर एखाद्या व्यक्तीला आपल मानण्यासाठी मग फक्त रक्ताचच नातं निमित्त ठरते.
 तसं जर आपलं मानायचे आहे, तर समग्र विश्व आपलं घर आपलं कुटुंब आहे. फक्त अंतर्मनात मनाची व्यापकता असायला हवी.
 तसं तर कुणी ही कुणाच्या जीवनात काही तरी निमित्ताशिवाय जात नाही. निसर्गाची किमया अनाकलनीय आहे. तुच्छ मानवी स्वभाव ती किमया ओळखु शकत नाही.
 कुणी कुणाच्या आयुष्यात काही निमित्ताशिवाय जात ही नाही. आणि कुणाच्या आयुष्यातुन बाहेर पडतही नाही. काही व्यक्ती ह्या चांगल्या अथवा वाईट अनुभवांशी निमित्त साधताना दिसतात.
एक मात्र विशेष की कुणी कुणाच्या आयुष्यात चांगल्या अथवा वाईट कुठल्या निमित्ताने जायचं हे नियती ठरवते. आणि माणुस ह्याच भ्रमात वावरतो की, हे मी केले. अन् ते मी केले. याला निमित्त संकुचित स्वभाव असतो.
   कुणी एखाद्याला मदत केली, सावरलं, सांभाळ केला, प्रगतीचा मार्ग दाखवला तर समजावे की, आपण चांगल्या निमित्ताने झिजतो आहे.
अनाकलनीय दर्शन घडविण्याची अथांगता फक्त ईश्वरी शक्तीकडे आहे. माणसांची बुध्दी त्या अथांगतेच्या जवळपास ही पोहचु शकत नाही. किती बुद्धीवान, मुत्सद्दी, चिकित्सक असतील तरीही…
 माणसाची नियत बऱ्याच गोष्टींना निमित्त ठरत असते. ती जर चांगली असेल तर चांगल्या गोष्टीसाठी त्याच शरिर झिजते. ती जर कलुषित असेल तर वाईट गोष्टींच्या निमित्त करून तेच नश्वर शरीर खंगते.
 ईश्वरी शक्ती कुणाला, कुणासाठी, कशासाठी, केव्हा, कुठे, कधी निमित्त बनवून पाठवेल, हे मानवाच्या समजण्या पलीकडे…. हे सांगणे अशक्य…मग तुम्ही कुठल्या गोष्टींसाठी निमित्त ठरताय???
©सौ. श्रध्दा जाधव बोरसे
Ashvini Pande

Recent Posts

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

6 hours ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

7 hours ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

7 hours ago

‘सचेत’ अ‍ॅप देणार आपत्तीची माहिती

अ‍ॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…

7 hours ago

वडनेरला द्राक्ष उत्पादकाची पंधरा लाखांची फसवणूक

पिंपळगावच्या व्यापार्‍याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची तब्बल 15…

8 hours ago

वरखेडा आरोग्य केंद्रात जखमीचा उपचाराअभावी मृत्यू

केंद्रास लावले कुलूप; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा दिंडोरी ः प्रतिनिधी वरखेडा (ता. दिंडोरी) येथील…

8 hours ago