महाराष्ट्र

वृक्षाची अवैध वाहतूक करणारा पुष्पा गजाआड

नाशिक : प्रतिनिधी
अवैध वृक्षांची कत्तल करुन वाहतूक करणार्‍या ट्रकचालकाला वन विभागाने काल रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ट्रकमधील तब्बल 26 टन लाकूड ताब्यात घेतले. इगतपुरी तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैधपणे वृक्षांची कत्तल सुरू होती. त्यामुळे वनविभागाचे पथक मागावरच होते. या भागातून वृक्षाची कत्तल करुन अवैध वाहतूक केली जात होती. अशी माहिती वनविभागाला मिळताच या भागात सापळा रचण्यात आला. इगतपुरी वनपरिक्षेत्र हद्दीत असलेल्या वासाळी फाटा येथे ट्रक एमएच 12 एचडी %856 हा सिन्नरच्या दिशेने जात असताना अडविण्यात आले. ट्रकचालकाकडे परवान्याची मागणी केली. मात्र परवाना नसल्याने वनविभागाचा संशय खरा ठरला. वनविभागाने ट्रक उघडून पाहिले असता त्यात आंबा, जांभूळ, सादडा या जातीचे अवैध रित्या तोडलेले वृक्ष गच्च भरलेले आढळून आले.  या ट्रकमध्ये अंदाजे 26 टन तोडलेल्या वृक्षाचे लाकूड असल्याचे वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचार्‍यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Bhagwat Udavant

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

2 days ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

2 days ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

2 days ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

2 days ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

2 days ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

2 days ago