नाशिक : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीतील उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वादांमुळे पक्ष अडचणीत आला असला, तरी आता त्या सर्व बाबींवर पडदा टाकून भाजपचा महापौर बसविण्याच्या उद्देशाने कार्यकर्त्यांनी एकदिलाने कामाला लागावे, असे स्पष्ट आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. तिकीटवाटपात झालेल्या चुका या प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याच असल्याचे मानून त्याची जबाबदारी मी घेतो, असे सांगत त्यांनी नाराज कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला.
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला अधिकृत सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने शहरातील श्रद्धा लॉन्स येथे ‘विजय संकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे जलसंपदामंत्री आणि भाजपाचे नाशिकमधील प्रमुख नेते गिरीश महाजन, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री व प्रदेश कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप, विजय साने, भाजप नाशिक महानगर सरचिटणीस सुनील देसाई, काशीनाथ शिलेदार, श्याम बडोदे, रश्मी हिरे-बेंडाळे, डॉ. अपूर्व हिरे, सुनील बागूल, माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, नाना शिलेदार, गोविंद बोरसे, महेश हिरे, पंचवटी मंडळ अध्यक्ष राहुल कुलकर्णी, सातपूर मंडळ अध्यक्ष नारायण जाधव, बापू शिंदे, मध्य नाशिक मंडळ अध्यक्ष वसंत उशीर यांच्यासह पक्षाचे उमेदवार तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना चव्हाण म्हणाले, ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडण्यापुरती मर्यादित नाही, तर नाशिकच्या पुढील पिढीचे भविष्य घडविण्याची ही लढाई आहे. उमेदवारीवरून शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पक्षावर दबाव आला आहे. वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करूनही उमेदवारी न मिळाल्याने वेदना होणे स्वाभाविक आहे. मात्र, भाजप हा शिस्तप्रिय पक्ष असून, ज्या चुका झाल्या आहेत, त्या करणार्यांवर अनुशासनात्मक कारवाई केली जाईल.
निवडणुकीस मुदतवाढ देणे आपल्या हातात नसते. अल्प काळात निर्णय घ्यावे लागतात, अशी खंत व्यक्त करत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले. उठाव करणे सोपे असते. मात्र, तो शांत करणे कठीण असते. नेत्यांनीच कार्यकर्त्यांना योग्य दिशा दिली पाहिजे, असे ते म्हणाले.
विकसित नाशिक घडविण्यासाठी येत्या दहा दिवसांत प्रत्येक आमदाराने आपल्या प्रभागात संघटन मजबूत करावे. प्रमुख व्यक्ती, कार्यकर्त्यांची टीम आणि आवश्यक व्यवस्था उभी करावी, असे
निर्देश त्यांनी दिले. ही 51 टक्क्यांची लढाई आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने दररोज किमान दहा तास पक्षासाठी काम करून सरकारच्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचवावी, असेही चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षा सुजाता डेरे यांनी आपल्या समर्थकांसह रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
Forget differences to become BJP mayor
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…