जमीन खंडणी प्रकरणी सातपुर पोलिसात गुन्हा

सिडको : विशेष प्रतिनिधी
सातपूर परिसरात खंडणी व जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करण्याच्या प्रकारावरून माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याच्यासह त्याचा मुलगा दीपक आणि भुषण आणि त्याचे सहकारी असे एकूण आठ आरोपींविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, यामध्ये पूर्वीही गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या व्यक्तींचा समावेश असल्याचे उघड झाले आहे.दरम्यान माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याच्यासह त्याच्या दोन्ही मुलांचे पाय अजुन खोलात जात आहेत सातपुर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर अंबड आणि आता सातपुर पोलिस ठाण्यात अजुन दुसरा गुन्हा दाखल झाल्यामुळे बुडत्याचे पाय डोहाकडे या प्रमाणे लोंढे कंपनीच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत
फिर्यादी शाहु बाबुराव म्हस्के (वय ७६ वर्ष, राह शिवतीर्थ रो-हाऊस नं. ५, विठ्ठलनगर, कामटवाडे, नाशिक) यांनी ही तक्रार दिली असून, त्यांनी त्यांच्या मालकीच्या सातपूर गावातील शिवारातील सर्वे नं. १८३/१ पैकी २३ गुंठे जमिनीबाबत ही कारवाई केली आहे.दि. २१ ऑक्टोबर २०२५ रोजी आरोपी दीपक प्रकाश लोंढे ऊर्फ नानाजी, प्रकाश मोगल लोंढे ऊर्फ बॉस, आणि भुषण प्रकाश लोंढे ऊर्फ भाईजी या तिघांनी गुन्हेगारी कट रचून आरोपी शोभा ऊर्फ सखुबाई म्हस्के, राहुल म्हस्के, सखुबाई यांची मुलगी आणि बेबाबाई यशवंत खंडेराव ऊर्फ चव्हाण तसेच यशवंत खंडेराव चव्हाण यांच्यासह संगनमत करून फिर्यादी यांच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला.
फिर्यादी हे त्यांची वरील जमीन विक्रीस काढण्याच्या प्रयत्नात असताना, आरोपी दीपक लोंढे याने धमकी दिली की ती जमीन तो सांगेल त्या भावात आणि त्यालाच विकावी लागेल. अन्यथा कोणालाही ती जमीन खरेदी करू देणार नाही, अशी धमकी देऊन ग्राहकांमध्ये दहशत निर्माण केली. यानंतर जमिनीच्या मोबदल्यात खंडणी मागितल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी काही आरोपींच्या विरोधात यापूर्वीही खून, खंडणी, दरोडा, धमकी, शस्त्र बाळगणे आणि यासारख्या अनेक गंभीर गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेले आहेत ही कारवाई सातपुर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भडांगे आणि पठाण करीत आहेत