नाशिक

माजी नगरसेवक गिते, बोडके, दिवे, ताजणे भाजपमध्ये

शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला गुरुवारी (दि. 3) भाजपने जोरदार धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विधानसभेतील उमेदवार गणेश गिते, माजी नगरसेवक कमलेश बोडके, शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक प्रशांत दिवे, सीमा ताजणे, सचिन मराठे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल, नवनियुक्त महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्या प्रवेशावरून भाजपवर टीका होत असल्याचे पाहून त्यांचा पक्षप्रवेश लांबणीवर टाकण्यात आला.

मागील काही दिवसांपासून नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविणारे स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांच्या प्रवेशाची चर्चा होती. मात्र, काही कारणास्तव प्रवेश लांबणीवर पडत होता. अखेर गिते यांचा बहुप्रतिक्षित प्रवेश मुंबई प्रदेश कार्यालयात झाला. गिते यांच्यासमवेत माजी नगरसेवक कमलेश बोडके, प्रशांत दिवे व सीमा ताजणे, कन्नू ताजणे यांचाही प्रवेश झाला. दरम्यान, गितेंमुळे हे तीन माजी नगरसेवक भाजपमध्ये आल्याचे बोलले जाते. शिवसेना ठाकरे गटाची गुरुवारची सकाळ धक्कादायक झाली. पक्षाचे उपनेते बागूल व पाच-सहा दिवसांपूर्वी महानगरप्रमुख पदाची माळ ज्यांच्या गळ्यात पडली ते राजवाडे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजताच ठाकरे गटात खळबळ माजली.
तीन-चार दिवसांपूर्वी बागूल, राजवाडे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर तेे दोघे फरार असून, भाजपमध्ये त्यांना प्रवेश कसा काय देत आहेत? यावरून भाजपवर चहूबाजूंनी टीका होऊ लागली. दरम्यान, हे प्रकरण अधिक वाढू नये यासाठी बागूल व राजवाडे यांना थांबवण्यात आले आहे. त्यामुळे या दोघांवर वेट अ‍ॅड वॉचशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे. विलास शिंदे यांच्या जागी काही दिवसांपूर्वी महानगरप्रमुखपदी मामा राजवाडे यांची नियुक्ती केली होती. या पक्षप्रवेशावेळी आमदार राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, सुधाकर बडगुजर, विजय साने आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी काही प्रवेश होणार : आ. फरांदे

नजीकच्या काळात शिवसेना उबाठा गटातील अनेक नेते भाजपच्या वाटेवर असून, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी प्रतिक्रिया आमदार देवयानी फरांदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्या म्हणाल्या की, काही कारणामुळे गुरुवारी (दि. 3 जुलै) होणारा उबाठा नेत्यांचा पक्षप्रवेश होऊ शकला नाही, पण हा प्रवेश पुढच्या आठवड्यात नक्कीच होईल, यात तीळमात्र शंका नाही.

भाजपला होणार फायदा

शहरात भाजपमध्ये अलीकडे शिवसेना उबाठातील नेत्यांचा व माजी नगरसेवकांंचा पक्षप्रवेश झाल्याने येत्या मनपा निवडणुकीत भाजपला याचा फायदा होणार आहे. चार सदस्यांचा प्रभाग असल्याने व यंदा मतदारसंख्या थेट पन्नास हजारांच्या पुढे गेली आहे. अशावेळी नव्याने पक्षात आलेल्या पदाधिकार्‍यांचा फायदा होणार असल्याने शहरात भाजपची ताकद वाढली आहे.

यापूर्वी आपण भाजपचे दहा वर्षे काम केले असून, पुन्हा पक्षात प्रवेश झाला आहे. ज्या भागातून आपण येतोे तेथील विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नाही. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या द़ृष्टीने विकासात्मक कामे करायची आहेत. सहकार्‍यांकडूनही त्याबाबत आग्रह होता. पक्षवाढीसाठी जी काही जबाबदारी दिली जाईल ती निःस्वार्थपणे पार पाडू. पक्षहितासाठी काम करत राहू.
– गणेश गिते, माजी सभापती, स्थायी समिती, नाशिक

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

11 hours ago