माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे निधन
नाशिक : प्रतिनिधी
माजी मंत्री व आदिवासी नेते मधुकरराव पिचड यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते असलेले मधुकरराव पिचड यांनी राज्याच्या राजकारणात अनेक वर्षे गाजविली. अकोले मतदार संघातून सातत्याने ते निवडून येत असत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. शिवाय आदिवासी विकास मंत्री म्हणून देखील त्यांची कारकिर्द संस्मरणीय राहिली. त्यांनी व त्यांच्या मुलाने 2019 ला भाजपात प्रवेश केला होता.
ब्रेनस्टोक झाल्यामुळे त्यांना नाशिकमधील नाइन पर्ल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दीड महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने अकोले तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा वैभव, सून, नातवंडे असा परिवार आहेे..
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…