माजी रेल्वे मंत्री मुकुल रॉय यांचे निधन

नवी दिल्ली :
माजी रेल्वेमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे संस्थापक सदस्य मुकुल रॉय यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. मुकुल रॉय यांचे सोमवारी (दि.23) पहाटे दीड वाजता वाजता कोलकातामधील अपोलो रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते गेल्या काही वर्षांपासून स्मृतिभ्रंश आणि इतर अनेक आरोग्य समस्यांशी झुंज देत होते. निधनापूर्वी काही दिवस ते कोमात होते. त्यांना अन्ननलिकेद्वारे द्रव आहार दिला जात होता. मुकुल रॉय यांच्या संघटनात्मक कौशल्यामुळे त्यांना ’बंगालच्या राजकारणाचे चाणक्य’ म्हणून ओळखले जात असे. 1998 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि ते ममता बॅनर्जी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात.

Former Railway Minister Mukul Roy passes away

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *