गोंदे ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांच्यावर लाच मागितल्याने गुन्हा
नाशिक : प्रतिनिधी
परमीट रूम तसेच बिअर बार सुरू करण्यासाठी ग्रामसेवक तसेच स्वतःसाठी75 हजार रुपयांची लाच मागितली म्हणून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अनिल दौलत तांबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार यांना गोंदे येथे हॉटेल आदित्य या नावाने परमिट रूम आणि बिअर बार सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र हवे होते त्यासाठी अर्ज केला होता .ना हरकत प्रमाणपत्र हवे असल्यास75 हजार द्यावे लागतील, अशी मागणी माजी सरपंच अनिल तांबे यांनी केली होती. ग्रामसेवक भनगीर यांच्यासाठी व स्वतःसाठी लाच मागितल्याने सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक चौधरी, अनिल गांगोडे, हवालदार सुनील पवार यांनी ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर ,अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
आपण वर्षभर विविध सण साजरे करतो. त्यात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळी सणाला…
भाकरी फिरवली नाही तर ती करपते. राजकारणात भाकरी फिरवण्याला फारच महत्त्व असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक…
येवल्याच्या स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या शिक्षक, विद्यार्थ्यांचे दातृत्व येवला : प्रतिनिधी दीपावली तोंडावर आली असताना, दुसरीकडे…
सिन्नर : प्रतिनिधी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून सिन्नरच्या व्यापार्याची तब्बल 64 लाखांची फसवणूक करणार्या…
शनिवारपासून पाणीयोजनेचा किमान एक पंप सुरू होण्याची अपेक्षा सिन्नर : प्रतिनिधी कडवा पाणीपुरवठा योजनेसाठी बनवण्यात…
भाजपाचे मुख्याधिकार्यांना निवेदन; तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी सिन्नर ः प्रतिनिधी सिन्नर शहरासाठी राज्याचे क्रीडा व…