हॉर्न वाजवला म्हणून चार गुंडांनी केला जीवघेणा हल्ला

हॉर्न वाजवला म्हणून चार गुंडांनी केला जीवघेणा हल्ला

नाशिकमध्ये स्ट्रीट क्राईम कमी होईना

सिडको:  विशेष प्रतिनिधी

-पाथर्डी फाटा परिसरातील आर के लॉन्स समोरुन चारचाकी वाहनातुन जाणा-या जेष्ठ नागरिकाने विनाकारण हॉर्न का वाजता असा जाब विचारण्याचा राग येऊन
चार गुंडांनी त्या जेष्ठ नागरिकावर धारदार तीक्ष्ण हत्याराच्या सहाय्याने धक्काबुक्की करत चाकूच्या सहाय्याने प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला. यानंतर गुंडांनी त्यांच्या चारचाकी वाहनावर दगडफेक करून वाहनाची तोडफोड करीत परिसरात दहशत माजवल्याचा प्रकार घडला या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते नववर्षाच्या पुर्व संध्येला हा प्रकार घडल्याने घटनास्थळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान या प्रकरणातील दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
याबाबत इंदिरानगर पोलिसांनी दिलेली अधिकृत माहिती अशी की, नववर्षाच्या पूर्वसंध्येला शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक मदन डेमसे यांचे वडील पाथर्डी गाव येथील प्रगतशील शेतकरी बाकेराव मामा डेमसे (वय ६० रा. पाथर्डी गाव) हे शनिवार दिनांक २९ मार्च रोजी त्यांच्या चारचाकी गाडीतुन पाथर्डी येथील आर के लॉन्सकडून त्यांच्या कार्यालयात जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी अचानक जोर जोरात हॉर्न वाजवला. यावेळी डेमसे विनाकारण हॉर्न का वाजवतात अशी विचारणा केली असता या चारींनी घटनास्थळी जोर जोरात आरडा ओरड करून धुमाकूळ घातला. यावेळी या गुंडांनी डेमसे यांना धक्काबुक्की केली. दरम्यान यातील एकाने त्यांच्यावर धारदार शस्त्र काढून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव वाचवला मात्र एवढ्यावरच न थांबता या गुंडांनी त्यांच्या लाल रंगाच्या चार चाकी वाहनाची दगडाच्या सहाय्याने तोडफोड करीत परिसरात धुमागूळ घातला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला एन सायंकाळी हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळतात इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी यातील दोन जणांना ताब्यात घेतले आहे. अन्य दोन जण फरार झाले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पाथर्डी ग्रामस्थांनी तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधींनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संबंधित गुंडांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान संशयीतांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

मागील आठवड्यात खून
गेल्या आठवड्यात पाथर्डी फाटा परिसरातील दामोदर चौकात एका १९वर्षीय तरुणावर चार ते पाच गुंडांनी धारदार कोयत्याने प्राण घातक हल्ला केल्याची घटना ताजी असताना त्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी अजुनही फरार असतांना आता पुन्हा एकदा जेष्ठ नागरिकावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला याघटनेमध्ये जेष्ठ नागरिक बालंबाल बचावले असले तरी याघटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *