नाशिक

अभोण्यात एकाच रात्री चार घरफोड्या, दुचाकीची चोरी

अभोणा : प्रतिनिधी अभोणा येथे नांदुरी रस्त्यावरील नववसाहतीत बुधवारी रात्री चार ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. त्यात अंदाजे दोन लाखांचा मुद्देमाल व एक दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील जनाबाई चव्हाण यांचे घराच्या खिडकीचे गज कापून घरात घूसलेल्या चोरट्यांनी देवघरातील देव्हार्‍यात ठेवलेली पाच हजारांची रोकड व पाच ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. ललित भोये यांचे घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला, पण हाती काहीही न लागल्याने चोरट्यांनी सर्व वस्तू अस्ताव्यस्त फेकल्या. हेमंत बागूल यांच्या घरातून 40 हजार रुपयांची रोकड लांबविली. सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोतीलाल गावीत यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले 50 हजार रुपये चोरून नेले. अशा प्रकारे चार घरफोड्यांनंतर चोरट्यांनी कन्सरा चौकात हरिश्चंद्र चव्हाण यांची होंडा कंपनीची दुचाकी घरासमोरून चोरून नेली. एकाच रात्री या पाच घटना घडल्या. अभोणा व परिसरात आधीच बिबट्यांची दहशत पसरलेली असताना चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, तसेच वस्तू विकण्यासाठी गांवभर फिरणारे अनोळखी फेरीवाले व इतर संशयित व्यक्तींची दखल घेऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. या घटनेची पोलिसांत अद्याप नोंद झालेली नाही.

Four house burglaries, two-wheeler theft in one night in Abhona

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

10 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

11 hours ago