नाशिक

नाशकात चारशे मतदान केंद्रे वाढणार

नगरविकासकडून निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर

नाशिक : प्रतिनिधी
शहरात होणार्‍या महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या वाढणार आहे. महापालिका निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून जून महिन्यापासून सुरू आहे. प्रशासनाने प्रभागरचनेसह इतर कामे करण्याकरिता मनपातील निवडणूक शाखेत पाच कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या चारशेने वाढणार आहे. वाढलेल्या मतदारसंख्येमुळे प्रशासनाकडून मतदान केंद्रे वाढवली जाणार आहेत. दरम्यान, नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर केला आहे.
2017 च्या निवडणुकीत एका प्रभागासाठी सरासरी चाळीस हजार मतदारांचा प्रभाग असे चित्र होते. परंतु, गत सात वर्षांत मतदारसंख्या मोठ्या संख्येने वाढली आहे. 2019 व 2024 या दोन लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका झाल्याने मतदारसंख्या थेट पावणेचौदा लाखांपर्यंत गेली आहे. परिणामी, महापालिकेच्या एका प्रभागातील सरासरी मतदारसंख्या थेट पंचावन्न हजारांच्या पुढे जाणार आहे. यामुळे मात्र उमेदवारांचा निवडणुकीत चांगलाच कस लागणार आहे. दरम्यान, शहराच्या व्याप्तीनुसार मतदान केंद्रांची संख्याही वाढणार आहे. यंदाच्या निवडणुकीत मनपाला सुमारे 1800 मतदान केंद्रांची आवश्यकता भासू शकते. गत निवडणुकीसाठी शहरात 1407 मतदान केंद्रे होती, त्यात आणखी चारशे केंद्रांची भर पडण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या निवडणूक शाखेने जिल्हा निवडणूक शाखेकडे अद्ययावत मतदार यादीची मागणी केली आहे. याच मतदार यादीनुसार मतदार केंद्रांची निश्चिती केली जाणार आहे. मात्र, तूर्तास मनपा प्रशासनाने वाढती लोकसंख्या व त्यानुसार वाढलेली मतदारसंख्या लक्षात घेता कच्चा आराखडा तयार केला आहे.

आयोगाला प्रभागरचनेचा आराखडा सादर

जून महिन्यापासून महापालिका प्रशासनाकडून प्रभागरचना तयार करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, महापालिकेने राज्याच्या नगरविकास विभागाला प्रभागरचनेचा आराखडा सादर केल्यानंतर नगरविकासने राज्य निवडणूक आयोगाला सोमवारी प्रस्ताव देण्यात आला आहे. यानंतर आयोगाकडून सदर प्रभागरचनेचा अभ्यास करून 22 ऑगस्टला प्रभागरचनेची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 

Gavkari Admin

Recent Posts

भाजपा नाशिक महानगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार नाशिक : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या नाशिक महानगर जिल्ह्याची सन…

16 hours ago

रेशन दुकानदारांच्या मार्जिनमध्ये 20 रुपये वाढ

मंत्रिमंडळाचा निर्णय; दुकानदारांमध्ये नाराजी नाशिक : प्रतिनिधी राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या…

16 hours ago

जिल्ह्यात दहशत बिबट्याची, पर्वणी चोरांची

अफवांची गावभर चर्चा; ग्रामीण भागात नागरिकांचा जागता पहारा निफाड : तालुका प्रतिनिधी गेल्या काही दशकापासून…

16 hours ago

सिन्नरला अतिक्रमणांवर हातोडा; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

मुख्याधिकारी कदम यांची धाडसी कारवाई सिन्नर : प्रतिनिधी अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने आठवडाभर अगोदर नोटिसा…

16 hours ago

पाच कोटी द्या, दीड लाख मतांची सेटिंग करू देतो…

गुजरातच्या व्यक्तीने त्यावेळी संपर्क केल्याची माजी आमदार चव्हाण यांची माहिती सटाणा ः प्रतिनिधी ईव्हीएम मॅनेज…

16 hours ago

संसदेसमोर कांदामाळ घालत खासदार आक्रमक

प्रतिक्विंटल 500 रुपये अनुदानासह हमीभाव देण्याची मागणी दिंडोरी : प्रतिनिधी एकीकडे गुजरात राज्यातील कांदा उत्पादक…

16 hours ago