नाशिकमध्ये  इन्फ्लूएंझाचे चार रुग्ण

नाशिक : प्रतिनिधी
भारताच्या काही भागात इन्फ्लूएंझाचे रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणश सतर्क झाली असतानाच नाशिक शहरातही चार रुग्ण आढळून आले आहेत.  बदलत्या वातावरणाचा परिणाम म्हणून देशभरात प्रादुर्भाव झालेल्या एच3 एन 2 या विषाणूचे आतापर्यंत शहरात चार रुग्ण आढळून आले आहेत.  या चारही रुग्णांची प्रकृती चांगली असून, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये,  असे आवाहन  आरोग्य विभागाने केले आहे.  4 फेब्रुवारीला  सिडकोतील एक महिला आढळून आल्यानंतर इंदिरानगर, महात्मानगर, आणि सिडकोतील आणखी एका महिलेला या विषाणूची लागण झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *